MLA Riti Pathak with Narendra Modi Sarkarnama
देश

BJP Politics : माझा 7 कोटींचा निधी कुठं गेला? भाजपच्या महिला आमदाराने उपमुख्यमंत्र्यांना स्टेजवरच विचारला जाब...Video Viral

MLA Riti Pathak Madhya Pardesh News Minister Rajendra Shukla : उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांच्याकडे आरोग्य खातंही आहे. सिधीमधील एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते. स्थानिक आमदार रिती पाठकही स्टेजवर होत्या.

Rajanand More

Bhopal News : कोणत्याही राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार असो, निधी वाटपावरून वाद ठरलेलाच असतो. याच विकास निधीच्या कारणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशातही निधीवरून आमदार उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. याबाबतचा एका महिला आमदाराचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

मध्य प्रदेशातील सिध्दी मतदारसंघाच्या आमदार रिती पाठक यांचा हा व्हिडिओ हे. त्यांनी स्टेजवरच राज्याचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांना स्टेजवरच जाब विचारला. माझ्या निधीचे सात कोटी रुपये कुठे गेले, असा सवाल करत त्यांनी तुम्हीच त्याचा शोध घ्या, अशी विनवणीही केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारचा समाचार घेतला आहे.

नेमकं काय घडलं?

उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांच्याकडे आरोग्य खातंही आहे. सिधीमधील एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते. स्थानिक आमदार रिती पाठकही स्टेजवर होत्या. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी निधीचा मुद्दा उपस्थित केला. मंत्र्यांना उद्देशून बोलताना त्या म्हणाल्या, मी रुग्णालयासाठी सात कोटींचा निधी मागितला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली होती. आरोग्य खात्याकडे निधी आल्यानंतर ते सात कोटी रुपये कुठे गायब झाले कळालेच नाही, असा दावा आमदारांनी केला.

मी सहा-सात वेळा तुम्हाला (राजेंद्र शुक्ला) पत्र लिहिले. पण एकाही पत्राचे उत्तर आले नाही. तुम्ही विंध्यचे विकास पुरुष आहात. रीवा जिल्हाच्या बाहेरही हा विकास यावा. त्यामुळे आरोग्य मंत्री म्हणून मी तुमच्यावरच गायब झालेले सात कोटी रुपये शोधण्याची जबाबदारी टाकते, असे थेट भाष्य आमदार पाठक यांनी केले.

आमदारांच्या हा आक्रमक पवित्रा सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावरून मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जीतू पटवारी यांनी निशाणा साधला आहे. आमदाराचेच ऐकले जात नाही, तर मग सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल? उपमुख्यमंत्र्यांसारखे असे किती नेते आहे, जे केवळ आपल्य जिल्ह्यापुरतेच मर्यादित झाले आहेत, असा प्रश्न आहे. एका जिल्ह्याचे हे हाल आहेत, मग 55 जिल्ह्यांचाही हिशेब द्यावा.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT