Brijbhushan Singh Chargesheet :  Sarkarnama
देश

Brijbhushan Singh Chargesheet : ब्रिजभूषणच्या अडचणी वाढणार; पोलिसांनी पुरावे गोळा केले, व्हिडीओ-फोटो..

Chargesheet Filed Against Brijbhushan Singh : साक्षी-पुरावे एकवटले..

सरकारनामा ब्यूरो

Brijbhushan Singh Chargesheet : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रावर कारवाई सुरू केली आहे. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या सहा तक्रारींपैकी चार तक्रारींमध्ये फोटो पुरावा आणि लैंगिक छळाच्या तीन प्रकरणांमध्ये व्हिडिओ पुरावा सादर करण्यात आला आहे.

द इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी गुरुवारी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध सहा महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ, मारहाण आणि पाठलाग केल्याप्रकरणी 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले. याची सुनावणी 22 जून रोजी होणार आहे. (Latest Marathi News)

आरोपपत्रात सहा पैलवानांची साक्ष, 70-80 साक्षीदारांचे जबाब आणि छायाचित्रे, व्हिडिओ आणि कॉल डिटेल रेकॉर्ड या तांत्रिक पुराव्यांचा समावेश आहे. तक्रारींची पुष्टी करण्यासाठी पोलिसांनी फोटो आणि व्हिडिओ पुराव्याचा संदर्भा दिल्याची माहिती आहे.

दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही आरोपपत्रात प्रत्येक तक्रारीचा स्वतंत्रपणे उल्लेख केला आहे. कारण सहा कुस्तीपटूंनी त्यांच्या तक्रारींमध्ये अनेक घटनांचा उल्लेख केला आहे. प्रत्येक तक्रारीसाठी आम्ही साक्षीदार, फोटो किंवा व्हिडिओ सादर केले आहेत. सहा तक्रारींपैकी आम्ही चार तक्रारींमध्ये फोटोग्राफिक पुरावे जोडले आहेत."

"तक्रारींमध्ये नोंदवलेल्या अनेक घटना कुस्ती महासंघ कार्यालय, स्पर्धा, शिबिरे आणि कार्यक्रमांच्या आहेत. आम्हाला काही व्हिडिओ देखील मिळाले आहेत, जे आम्ही आरोपांना पुष्टी देण्यासाठी आरोपपत्रात नमूद केले आहेत. आता गुन्ह्याचे स्वरूप आणि शिक्षेचा निर्णय न्यायालयावर आहे. आम्ही फक्त तक्रारींशी संबंधित तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत," असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT