Jammu and Kashmir News : जम्मू आणि काश्मीरमधील नगरोटा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंदर सिंह राणा यांचे शुक्रवारी मध्यरात्री निधन झाले. पंजाबमधील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे ते बंधू होते. देवेंदर राणा यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
देवेंदर सिंह राणा हे भाजपमधील मातब्बर नेते होते. मृत्यूसमयी त्यांचे वय 59 वर्षे होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार जोगिंदर सिंह यांचा 30 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत एवढ्या मताधिक्याने विजय झालेल्या उमेदवारांमध्ये देवेंदर सिंह पहिल्या क्रमांकावर होते. त्यामुळे त्यांच्या नावावर हा विक्रम जमा झाला होता.
देवेंदर राणा हे नॅशनल कॉन्फरन्सचा हिंदू चेहरा म्हणून परिचित होते. 2014 च्या निवडणुकीत ते याच पक्षाच्या तिकीटावर निवडून आले होते. मोदी लाटेतही त्यांनी आपला दबदबा कायम राखला होता. मात्र, 2021 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत नवी राजकीय इनिंग सुरू केली होती.
राणा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, नायब राज्यपाल मनोज सिन्हा, माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
मोदींनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, देवेंद्र सिंह राणा यांचे अकाली जाणे धक्कादायक आहे. जम्मू आणि काश्मीरच्या प्रगतीसाठी झोकून देत काम करणारे ते नेते होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपला मजबूत करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. नुकतेच ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.