PM Modi Twitter
देश

काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी कधी काळी मोदींना केदारनाथमध्ये बंदी घातली होती

पुढच्या वर्षात उत्तराखंडमध्ये निवडणूका होत असल्याने मोदींच्या या दौऱ्याकडे राजकीय दृष्ट्या देखील अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

केदारनाथ : पंतप्रधान नरेंद्र मोदी काल उत्तराखंडमध्ये पोहचले होते. या दौऱ्यात त्यांनी जवळपास पावणे चारशे कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. सोबतच त्यांनी आदी शंकराचार्यांच्या पुतळ्याचे अनावरण, मंदाकिनीवरील पूल आणि तीर्थक्षेत्रातील पुजार्‍यांसाठीची निवासस्थाने, तसेच इतर अनेक पुनर्निर्माण कामांची पायाभरणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी हे दशक उत्तराखंडचं आहे. त्यामुळे १०० वर्षात आले नाहीत एवढे भाविक पुढच्या १० वर्षात इथे येतील, असा दावाही केले. पुढच्या वर्षात उत्तराखंडमध्ये निवडणूका होत असल्याने मोदींच्या या दौऱ्याकडे राजकीय दृष्ट्या देखील अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

आता हा झाला सगळा वर्तमान. आज मोदी इथं पंतप्रधान होवून पोहचले आहेत. पण एकवेळ अशी होती की उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना केदारनाथमध्ये बंदी घातली होती. गोष्ट आहे २०१३ मधील. नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. तर उत्तराखंडमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत होता आणि मुख्यमंत्री होते विजय बहुगुणा. त्यावर्षी उत्तराखंडमध्ये महापूरामुळे प्रचंड मोठी नैसर्गिक आपत्ती येवून केदारनाथचे बरेच नुकसान झाले होते.

त्यानंतर मुख्यमंत्री असलेल्या मोदींनी बहुगुणांकडे केदारनाथला भेट देवून नुकसानीचा आढावा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यांनी मोदींना यासाठी स्पष्ट नकार कळवला. इतकेच नाही तर केदारनाथच्या पुनर्निर्मितीसाठी मदत देण्याची इच्छाही मोदींनी बोलून दाखवली होती. पण उत्तराखंड सरकारने ही मदत स्विकारायला देखील नकार दिला होता.

पुढे २०१४ साली झालेल्या निवडणूकांमध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले, तर २०१७ साली झालेल्या राज्य विधानसभांच्या निवडणूकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला, आणि उत्तराखंडमध्येही भाजपचे सरकार आले. या सगळ्या काळात मोदींनी कालचा दौरा धरुन एकुण पाच वेळा केदारनाथला भेट दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT