Saif Ali Khan Sarkarnama
देश

Saif Ali Khan Update : सैफ अली खानच्या कुटुंबाला मोठा झटका; 15 हजार कोटींची संपत्ती सरकारजमा होणार

Bhopal Property Pataudi Family Madhya Pradesh Government : चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खान याला आजच रुग्णालयातून घरी सोडले आहे. या घटनेमुळे खान कुटुंबियांना मोठा धक्क बसला होता.  

Rajanand More

Saif Ali Khan Latest News : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर कुटुंबाला दुसरा मोठा धक्का बसणार आहे. पतौडी कुटुंबाची तब्बल 15 हजार कोटींची संपत्ती सरकारजमा होण्याची शक्यता आहे. भोपाळमधील ऐतिहासिक संपत्तीवरून 2015 पासून असलेल्या स्थगितीची मुदत आता संपली आहे.

सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वी चोरट्याने मुंबईतील घरात घुसून चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सैफला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात उपचारानंतर आता सैफची तब्येत सुधारली आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशातून सैफ कुटुंबियांना हादरवणारी बातमी आली आहे.

भोपाळच्या कोहेफिजा ते चिक्लोडपर्यंत पतौडी कुटुंबाची मालमत्ता विस्तारलेली आहे. ही मालमत्ता पतौडी कुटुंबाच्या ऐतिहासिक भोपाळ राजवटीचा भाग आहे. त्यावर 2015 पासून मध्य प्रदेश कोर्टाची स्थगिती आहे. पतौडी कुटुंबानं 2015 मध्ये एक याचिका दाखल करत सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यानंतर कोर्टाने या संपत्तीवर सरकारचे नियंत्रण आणण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. 

भारताची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानात निघून गेलेल्या लोकांच्या संपत्तीबाबत शत्रू संपत्ती अधिनियम 1968 नुसार प्रशासनाकडून कार्यवाही केली जाते. भोपाळमधील जमिनीचे पतौडी कुटुंब उत्तराधिकारी असल्याचा दावा केला जात असून त्यावरून वाद सुरू आहे. या वादामध्ये सैफ अली खानसह त्याची आई शर्मिला टागोर, बहीण सोहा अली खान आणि पतौडी यीं बहीण सबीहा सुलताना यांचा समावेस आहे.

पतौडी कुटुंबाच्या मालकीची 100 एकर जमीन असून या जमिनीवर सध्या दीड लाख लोक राहत आहेत.  कोर्टाने त्यांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली होती. पण त्यानंतर त्यांच्याकडूनही काहीही म्हणणे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे संपत्तीवर टाच येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शत्रू संपत्ती अधिनियम 1968 च्या अंतर्गत भोपाळच्या शेवटच्या नवाबाच्या संपत्तीवर नियंत्रण आणण्याबाबत सरकारने निर्णय घेतला होता. या नवाबाची मोठी मुलगी राजकुमारी आबिदा सुलतान 1950 मध्ये पाकिस्तानला गेली होती. नवाबाच्या मृत्यूनंतर त्याची दुसरी मुलगी मेहर ताज साजिदा सुलतान बेगमला संपत्तीचं उत्तराधिकारी घोषित करण्यात आलं. पतौडी कुटुंबीय त्यांचेच उत्तराधिकारी असल्याचा दावा केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT