Non-Veg Ban 
देश

शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणे अन् रस्त्यांलगत मांसाहाराच्या स्टॉलवर बंदी

मंगळवारपासूनच होणार निर्णयाची अंमलबजावणी...

सरकारनामा ब्युरो

अहमदाबाद : गुजरातमधील राजकोट, जूनागड आणि भावनगर शहरांपाठोपाठ आता अहमदाबादमध्येही मांसाहारावर बंधने घालण्यात आली आहेत. मंगळवारपासून अहमदाबादमध्ये रस्ते, शाळा, महाविद्यालये, उद्याने व इतर सार्वजनिक ठिकाणी अंडी, मांसाहारी पदार्थांची स्टॉल लावून विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. अहमदाबाद महापालिकेने सोमवारी याबाबतचा आदेश काढला आहे.

महापालिकेच्या आदेशानुसार, मंदीरे, उद्याने, शाळा, महाविद्यालयांसह अन्य सार्वजनिक ठिकाणी खुल्या जागेत स्टॉल लावता येणार नाहीत. महापालिकेच्या इस्टेट विभागाचे अध्यक्ष देवांग दानी यांनी सांगितले की, प्रमुख रस्त्यांवरील सर्वप्रकारच्या स्टॉलला हटवले जाणार आहे. मांसाहारी पदार्थ विक्री करणाऱ्यांना परवाना घ्यावा लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणांपासून 100 मीटर अंतरापर्यंत स्टॉलवर मांसाहारी पदार्थ विक्री करता येणार नाहीत.

या निर्णयानंतर काँग्रेसने भाजपर टीका केली आहे. काँग्रेसचे नेते दिनेश शर्मा निवडणुका येताच भाजपकडून धर्माचे राजकारण सुरू केले जाते, असा आरोप केला. तर दुसरीकडे मांसाहारी पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील दहा वर्षांपासून एका विद्यापीठाबाहेर अंड्यांची विक्री करणारा राजू भाई हा विक्रेता म्हणाला, माझे कुटुंबाचे पोट कसे भरणार, याची चिंता लागली आहे. मागील दहा वर्षांपासून इथेच अंडी विकत होतो.

अहमदाबादच्या निर्णयाआधी वडोदरा आणि राजकोटमध्येही महापालिकेने रस्त्यांलगत मांसाहारी पदार्थ विक्रीला मनाई केली आहे. रस्त्यांवर मांसाहारी पदार्थ विकले जात असल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. तसेच या स्टॉलमधून निघणारा धूरही आरोग्यासाठी हानीकारक आहे, असे आदेशात म्हटले आहे. राजकोटचे महापौर प्रदीप दाव यांनी मागील आठवड्यात याबाबतची मोहिम हाती घेतली आहे.

वडोदरा पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष हितेंद्र पटेल यांनी 15 दिवसांमध्ये रस्त्यांवरील मांसाहारी स्टॉल हटवण्याचे आदेश दिले आहेत. तर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारी आलेल्या ठिकाणीच प्रतिबंध लावण्यात आले आहेत. दाव यांनीही हीच री ओढली. तक्रारी आल्यानंतरच ही मोहिम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT