BJP politics Sarkarnama
देश

Falta BJP victory : निवडणूक आयोगाने फेरमतदान घेतले, भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय; सर्वच विरोधी पक्षांचा धुराळा...

BJP latest news Bengal, Trinamool Congress setback : फालटा मतदारसंघातील विजयानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूलवर जोरदार टीका केली.

Rajanand More

West Bengal election news : पश्चिम बंगालमधील फालटा विधानसभा मतदारसंघात झालेल्या फेरमतदानाची मतमोजणी रविवारी पार पडली. यामध्ये भाजपने सर्व विरोधी पक्षांना धूळ चारत दणदणीत विजय मिळविला आहे. तृणमूल काँग्रेसचा २०११ वर्षांपासूनच गड उध्वस्त करत भाजप उमेदवाराने रेकॉर्डब्रेक मते मिळविली आहेत. तृणमूलचा उमेदवार थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

फालटा मतदारसंघात गैरप्रकारांमुळे भारतीय निवडणूक आयोगाने फेरमतदान घेतले. भाजपचे उमेदवार देबांग्शू पांडा आणि तृणमूलचे उमेदवार जहांगीर खान यांच्यातच खरी लढत होती. मात्र, खान यांनी मतदानाच्या काही तास आधीच निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे पांडा यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्यानुसार मतदारांनीही पांडा यांच्या बाजूनेच कौल दिला आहे.

कुणाला किती मते?

फालटा मतदारसंघ टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघातील आहे. भाजपचे उमेदवार पांडा यांनी तब्बल १ लाख ४९ हजार ६६६ मते मिळवत बॅनर्जी यांनाच मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. खान हे बॅनर्जी यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. त्यांना केवळ ७ हजार ७८३ मते मिळाली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार शंभू नाथ कुर्मी हे दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यांना ४० हजारांहून अधिक मते मिळाली. तर काँग्रेसचा उमेदवार सुमारे १० हजार मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

फालटा मतदारसंघातील विजयानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूलवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, हायमंड हार्बर मॉडेल आता तृणमूलचे पराभूत मॉडेल बनले आहे. मी लोकांना एक लाख मतांनी विजय मिळवून देण्याचे आवाहन केले होते. मतांचे अंतर १ लाख ८ हजारांहून अधिक राहिले. आता भाजपचे विकास मॉडेल 'गोल्डन फालटा' बनवेल.

दरम्यान, फालटामध्ये सुरूवातीला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार होते. मात्र, मतदान प्रक्रिया सुरू असताना अनेक मतदान केंद्रांवर गैरप्रकार समोर आले. त्यामुळे निवडणूक आयोगाने फेरमतदानाचा निर्णय घेतला. यामध्ये भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे आता पश्चिम बंगालमध्ये २०८ आमदार झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT