amit Shah, eknath shinde, ravindra chavan Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, अमित शाहांना भेटणार! 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चा, खरं कारण काय?

Amit Shah Operation Tiger MLC Election : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. या दौऱ्यात ते गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

Roshan More

Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत. विधानपरिषदेच्या जागांचा तिढा सोडवण्यासाठी ते दिल्लीत गेले आहेत. या दौऱ्यात ते गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत, या विषयीचे वृत्त 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

17 जागांसाठी निवडणूक होत असताना भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला चार जागा देण्याची तयारी दाखवली मात्र, शिवसेना सहा जागांसाठी आग्रही आहे. यावर तोडगा काढण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी शिंदेंची भेट घेतली. मात्र, या बैठकीत देखील तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे.

अमित शाह यांच्या भेटीमध्ये जागा वाटपासोबतच ऑपरेशन टायगरची देखील शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेकडून 7 जागांवर ठाम दावा केला आहे. शिवसेनेने भाजपसमोर आधीच्या 5 आणि नव्याने ताकद वाढलेल्या 2 अशा एकूण 7 जागांचा अधिकृत प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. भाजपने शिवसेनेला केवळ 3 ते 4 जागा देण्याची तयारी दर्शवली होती.

एक जागेवरून युती अडली?

भाजप आणि शिवसेनेमध्ये सर्व जागांवर एकमत झाले आहे. मात्र, ठाण्याच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे. तर, शिवसेनेने या जागेसाठी आपला आग्रह कायम ठेवला आहे. या एका जागेवर चर्चा आडल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT