थोडक्यात बातमीचा सारांश :
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात करत म्हटलं की त्यांच्या मुलाखती कोणीच बघत नाही.
कदम म्हणाले की, “स्वतःच विचारायचं आणि स्वतःच उत्तर द्यायचं” – ही मुलाखत नव्हे, हास्यास्पद आहे.
त्यांच्या विधानामुळे शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
Ratnagiri News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत खासदार संजय राऊत यांनी घेतली. ही मुलाखत 'सामना' वर्तमानपत्रासाठी घेण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांवर सडेतोड उत्तर देताना एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेवर टीका केली. तसेच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेसह भाजपने पुढे हात केल्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पलटवार केला आहे. त्यांनी, उद्धव ठाकरे यांची मुलाखत त्यांचे शिवसैनिकही बघत नाहीत!, त्यामुळे या मुलाखतीला गांभिर्याने घेण्याची गरज नाही असा टोला लगावला आहे. (Yogesh Kadam slams Uddhav Thackeray's interview style saying no one watches, not even Shiv Sainiks)
सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका करताना ठाकरे हे नुसते ब्रँड नाही तर महाराष्ट्राची ओळख असल्याचे म्हटलं. हाच ठाकरे ब्रँड एकनाथ शिंदे यांनी पळवण्याचा प्रयत्न केला. तो चोरला. असो अशा पोकळ लोकांनाच ठाकरे ब्रँडची गरज भासते, अशी टीकाही त्यांनी केली होती. यावरून आता नवा वाद सुरू झाला असून शिवसेना विरूद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे यांनी पोकळ लोकांना म्हणत एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केल्याने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पलटवार केला आहे. त्यांनी पहिली गोष्ट या मुलाखतीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कारण त्यांची मुलाखत कोणी बघत नाही. त्याचे शिवसैनिकच बघत नाहीत. आणि 'स्वतःची मुलाखत स्वतःच घेऊन टीका करणे असा प्रकार आम्ही जगामध्ये पहिल्यांदा पाहत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
यावेळी योगेश कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीवर देखील भाष्य केलं. त्यांनी हे फक्त भाजप असो की राष्ट्रवादी आमच्या सख्ख नाहीये असे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण हा प्रकार स्वतःच राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सुरू आहे. कोण कोणाबरोबर आहे की नाही हे या अधिवेशनामध्ये दिसून आले आहे.
आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये देखील शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा होता. जे कोणालाही नाकारता येणार नाही. तसेच आज जे महाराष्ट्रामध्ये महायुतीला यश मिळालेला आहे. त्यातही शिंदेंच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा होता. आज आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व मंत्री काम करत असून शिवसेना आणि भाजपमधील कोऑर्डीनेशन अतिशय चांगले असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.
आता एकनाथ शिंदे यांच्यावर ते दिल्लीला लपून जातात म्हणून टीका केली जातेय. पण हे मुख्यमंत्री होण्यासाठी सोनिया गांधी यांना भेटायला दिल्लीत गेले होते तेव्हा. मुख्यमंत्रीपदासाठी यांनी तर काँग्रेसचे तळवे चाटले त्याचं काय? हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवला. पण हेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे असते तर असं केलं असतं का? त्यामुळे दुसऱ्याकडे एक बोट दाखवण्याआधी आपल्याकडे किती बोट होतात याचा विचार त्यांनी करावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
1. योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय टीका केली?
त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरेंच्या मुलाखती कोणी पाहत नाही आणि त्या स्वमूलाखती हास्यास्पद वाटतात.
2. कोणत्या पार्श्वभूमीवर हे विधान करण्यात आले?
उद्धव ठाकरेंनी अलीकडेच एक मुलाखत दिली होती जी स्वतःच्याच पक्षाच्या सदस्यांनी घेतली होती.
3. यामुळे काय राजकीय परिणाम झाले?
या वक्तव्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत आला असून दोन्ही गटांमध्ये वादाची तीव्रता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.