Phulambri Assemlbly Constitueuncy Sarkarnama
मराठवाडा

Phulambri Assembly 2024 Result : फुलंब्री मतदारसंघात भाजपच्या अनुराधा चव्हाण 7596 आघाडीवर

BJP's Anuradha Chavan is leading in Phulambri constituency : अनुराधा चव्हाण यांची आघाडी वाढत असून त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसते. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यानंतर या मतदारसंघातून भाजपने अनुराधा चव्हाण या महिला उमेदवाराला पंसती दर्शवली होती.

Jagdish Pansare

Phulambri Assembly Constituency : विधानसभेच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या अनुराधा चव्हाण या पहिल्या फेरीच्या मतमोजणीपासून आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीअखेर अनुराधा चव्हाण यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे विलास औताडे यांच्यावर 7596 मतांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरीत अनुराधा चव्हाण यांना 6131 तर विलास औताडे यांना 3618 मते मिळाली आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झालेल्या या मतदारसंघात भाजपच्या अनुराधा चव्हाण यांची आघाडी कायम असून तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीनंतरही अनुराधा चव्हाण यांची आघाडीवर आहेत. (BJP) पहिल्या फेरीत अनुराधा चव्हाण यांना 5967 दुसऱ्या फेरीत 6317 तर तिसऱ्या फेरीत 6131 मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस महाविकास आघाडीचे विलास औताडे यांना पहिल्या फेरीत 3205 दुसऱ्या फेरीत 3996 तर तिसऱ्या फेरीमध्ये 3618 मते मिळाली आहेत.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झालेल्या या मतदारसंघात भाजपच्या अनुराधा चव्हाण यांची आघाडी कायम असून तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीनंतरही अनुराधा चव्हाण यांची आघाडीवर आहेत. (Mahayuti) पहिल्या फेरीत अनुराधा चव्हाण यांना 5967 दुसऱ्या फेरीत 6317 तर तिसऱ्या फेरीत 6131 मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस महाविकास आघाडीचे विलास औताडे यांना पहिल्या फेरीत 3205 दुसऱ्या फेरीत 3996 तर तिसऱ्या फेरीमध्ये 3618 मते मिळाली आहेत.

अनुराधा चव्हाण यांची आघाडी वाढत असून त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसते. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यानंतर या मतदारसंघातून भाजपने अनुराधा चव्हाण या महिला उमेदवाराला पंसती दर्शवली होती. विधानसभेच्या फुलंब्री मतदार संघात 15 वर्षानंतर भाजप महायुतीकडून नवा चेहरा देण्यात आला.

भाजपचे दोन टर्म आमदार राहिलेले हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिला जाते याची बरीच चर्चा मतदारसंघात झाली. अखेर भाजपने अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी देत या चर्चेला पूर्णविराम दिला. फुलंब्री विधानसभा मतदारसंघ गेल्या दहा वर्षापासून भाजपच्या ताब्यात आहे. 2009 मध्ये काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी भाजपच्या हरिभाऊ बागडे यांचा अवघ्या अडीच हजार मतांनी पराभव केला होता.

त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र बागडे यांनी विजय मिळवत फुलंब्री मतदार संघ भाजपचा गड असल्याचे दाखवून दिले होते. अनुराधा चव्हाण यांच्या रूपाने फुलंब्री मतदार संघात पहिल्यांदा भाजप ने महिला उमेदवार दिल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले. हरिभाऊ बागडे यांचा राजकीय वारसदार म्हणून अनुराधा चव्हाण यांची पक्षाने निवड केल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT