Chhatrapati Sambhajinagar : नवे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज प्रभारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडून पदभार स्वीकारला. सोलापूर जिल्हा परिषदेचा पदभार सोडल्यानंतर गेल्या आठ महिन्यापासून स्वामी नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांना छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. काल नियुक्तीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर आज सकाळी शहरात दाखल होत त्यांनी पदभार घेतला. Collector Dillp Swami News
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधी मिशन निवडणूक असे म्हणत निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यावर आपला भर असेल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्वसामान्यांच्या मनात प्रशासनाबद्दल कुठल्याही प्रकारचा किंतु-परंतु राहू नये, यासाठी आपण वेगवान आणि पारदर्शक कारभार करू, अशी ग्वाही त्यांनी पदभार स्वीकरतांना दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अडीच वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केल्यानंतर त्यांच्या जागेवर मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली होती. परंतु दिलीप स्वामी यांना पोस्टिंग देण्यात आली नाही. तब्बल साडेसात-आठ महिने त्यांना वाट पाहावी लागली. शेवटी मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरात जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
जिल्हा परिषदेमध्ये काम करताना त्यांनी अनेक उपक्रम राबवले. विविध संकल्पना समोर आणल्या त्यामधील काही उपक्रम आणि संकल्पना राज्य शासनाने स्वीकारल्या. सोलापूर जिल्ह्यात आरोग्य विभाग, शिक्षण, ग्रामपंचायत अशा सगळ्या विभागामध्ये स्वामी यांनी भरीव काम केले. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका त्यांनी प्रशासन म्हणून निभावली. First Mission Election, Collector Swamy started work
संभाजीनगरात आज पदभार स्वीकारताच 'प्रशासन गतिमान, पारदर्शक आणि संवेदनशील करण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य राहील,' असे स्वामी यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटन विकासासाठी अधिक काम करणे गरजेचे आहे.
तत्पुर्वी आता प्राधान्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यावर आपला भर असणार आहे. जिल्ह्यातील टंचाई विषयक उपाययोजना, त्याच बरोबर जिल्ह्याचे प्रशासन हे गतिमान, पारदर्शक आणि संवेदनशील करणे हे आपले उद्दिष्ट असेल. प्रशासनाबद्दल जनतेच्या मनात कोणतेही किंतू परंतू राहु नये यासाठी प्राधान्य असेल, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी म्हणाले प्रभारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्वामी यांचे स्वागत करत त्यांच्याकडे पदभार दिला.
Edited By : Rashmi Mane