Shivsena Leader Ambadas Danve Allegation On Ranjeetsinh Naik Nimbalkar News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : तो मी नव्हेच' म्हणणाऱ्या निंबाळकरांचा या डॉक्टर प्रकरणाशी संबंध कसा ते पहा! अंबादास दानवे आरोपावर ठाम

Phaltan Leady Doctor Case : खासदार साहेबांशी बोला,असे सांगत दोन पीए या महिला डॉक्टरकडे आले होते. आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरने याविषयी आपल्या जबाबात हे स्पष्ट नमूद केले आहे.

Jagdish Pansare

  1. डॉक्टर प्रकरणात निंबाळकरांचं नाव पुढं आल्यानंतर त्यांनी “तो मी नव्हेच” असं सांगत स्वतःचं स्पष्टीकरण दिलं.

  2. मात्र अंबादास दानवेंनी ठामपणे सांगितलं की निंबाळकरांचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे आणि पुरावे देखील आहेत.

  3. या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा वाद पेटला असून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Shivsena UBT News : फलटण येथील डाॅक्टर तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणावरून राजकारण तापले आहे. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधकांनी या प्रकरणात रणजीतसिंह नाईक रामराजेनिंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी आपण आरोपांवर ठाम असल्याचे सांगत डाॅक्टर प्रकरणाशी निंबाळकरांचा संबंध कसा ते पहा? असे म्हणत काही घटनाक्रमांचा उल्लेख केला आहे.

अंबादास दानवे यांनी या संदर्भात एक्सवर पोस्ट केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या माणसासोबत व्यासपीठावर बसतील ज्याने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या एका महिला डॉक्टरवर फिटनेसबाबत दबाव टाकला. 'तो मी नव्हेच' म्हणणाऱ्या निंबाळकरांचा या डॉक्टर प्रकरणाशी संबंध कसा ते पहा, असे म्हटले आहे.

मल्हारी अशोक चन्ने (42) हा आरोपी रक्तदाब वाढल्या कारणाने टूडी इकोसाठी मृत महिला डॉक्टरने रेफर केला होता. हे रेफरल दिल्यावर खासदार साहेबांशी बोला,असे सांगत दोन पीए या महिला डॉक्टरकडे आले होते. आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरने याविषयी आपल्या जबाबात पहिल्या पानावर ओळ क्रमांक 21 ते 31 यावर हे स्पष्ट नमूद केले आहे. याच स्टेटमेंटमध्ये खासदार महोदयांनी 'आपण बीडचे असल्याने आरोपीला 'फिट' देत नाहीत, अशी पोलिसांची कंप्लेंट आहे' असे सांगितल्याचे या महिला डॉक्टरने स्पष्टपणे नमूद केले आहे.

दुसरा पुरावा म्हणजे फलटण जेएमएफसी कोर्टात दाखल झालेल्या खटल्याची माहिती सांगणारा हा फोटो. वरील आरोपी चन्ने याच्या विरोधात स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल लिमिटेड, उपळवे या कंपनीने दावा दाखल केला होता. ज्याचा Filing number SCC/2433/2024 तर Case Registration Number SCC/1883/2024 हा आहे. ही स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल कंपनी निंबाळकर यांच्या मालकीची आहे, हे निंबाळकर यांच्या प्रोफाईलवरच नमूद आहे. महिला डॉक्टरला फोनवरून बोलणे करून देणारे दोन पीए म्हणजे राजेंद्र शिंदे आणि रोहित नागटीळे!

आता एवढं दिल्यावर तापास करणाऱ्या पोलिसांनी हे पण सांगावे की डीवायएसपी राहुल धस आणि पीआय अनिल महाडिक यांचा यात काय सहभाग होता! नाहीतर मला हे सांगावं लागेल. बाकी हे महायुती सरकार चुकीची कामे करणाऱ्यांना पाठीशी घालणारे आहेच, हे नवीन राहिलेले नाही. एका कर्तव्यदक्ष डॉक्टरची किंमत सरकारच्या लेखी काय आहे हे आज देवेंद्र फडणवीस फलटणला गेल्यावर सगळ्या महाराष्ट्राला कळणार आहेच, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला आहे. कायद्याचे न उरले भान..देवाभाऊंच्या सरकारमध्ये महिलांचा अपमान, असेही दानवे यांनी शेवटी म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन विरोधकांना फटकारले. तसचे, 'रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही पुर्ण ताकतीने तुमच्या पाठीशी आहोत‌', असा शब्दही दिला. फलटणच्या विकासासाठी सातत्याने संघर्ष केला ते आमचे मित्र रणजितसिंह नाईक निंबाळकरजी, असा उल्लेख फडणवीसांनी केला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर भाष्य केले.

FAQs

  1. डॉक्टर प्रकरण नक्की काय आहे?
    – हे महाराष्ट्रातील एका डॉक्टर आत्महत्येशी संबंधित प्रकरण आहे ज्यात काही नेत्यांची नावं जोडली गेली आहेत.

  2. निंबाळकरांनी काय प्रतिक्रिया दिली?
    – त्यांनी “तो मी नव्हेच” असं सांगत स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले.

  3. अंबादास दानवेंनी काय म्हटलं?
    – त्यांनी निंबाळकरांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं ठामपणे सांगितलं आणि राजकीय जबाबदारीची मागणी केली.

  4. या वादाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
    – या प्रकरणामुळे भाजप-शिवसेना संबंधांवर आणि स्थानिक राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो.

  5. पुढील कारवाई काय अपेक्षित आहे?
    – चौकशीची मागणी वाढली असून, लवकरच अधिकृत तपास होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT