Paithan Assembly Constitueuncy Sarkarnama
मराठवाडा

Paithan Assembly Election Result : पैठणमध्ये भुमरे यांचाच जोर, आघाडी तुटेना

Vilas Bhumre marching towards victory in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संदिपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे हे विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसते आहे.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या पैठण मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे शिवसेना महायुतीचे विलास बापू भुमरे यांनी आपली आघाडी कायम राखत पंधराव्या फेरीअखेर 22 हजार 603 मतांची आघाडी घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीचे दत्ता गोर्डे यांच्यावर पहिल्या फेरीपासून विलास भुमरे यांनी घेतलेली आघाडी पंधराव्या फेरीमध्ये 22000 च्या पुढे गेली. विलास भुमरे यांना पंधराव्या फेरीअखेर 82297 तर दत्ता गोर्डे यांना 59694 मते मिळाली आहेत.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संदिपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे हे विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसते आहे. (Paithan) शिवसेना महाविकास आघाडीने दत्ता गोर्डे यांना उमेदवारी देत विलास भुमरे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केल्याचे चित्र होते. मात्र निवडणूक प्रचार संपण्याच्या दोन दिवस आधी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले विलास भुमरे रुग्णालयात दाखल होते.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा

त्यांना मतदान आणि शेवटच्या टप्प्यात प्रचारही करता आला नाही. यानंतरही पैठण मधील मतदारांनी आपला कौल शिवसेना महायुतीच्या बाजूने दिल्याचे दिसत आहे. (Shivsena) खासदार संदिपान भुमरे यांनी पैठण मधून सहा वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

यापैकी पाच वेळा त्यांनी विजय मिळवला होता. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ संदिपान भुमरे आणि आता त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव विलास भुमरे आपल्याकडे राखण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. शिवसेनेत फूड पडल्यानतंर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पैठणचे आमदार तथा तत्कालीन मंत्री संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगर मधून निवडून आले.

भुमरे खासदार झाल्यानंतर पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीने त्यांचे सुपूत्र विलास (बापू) भुमरे यांना उमेदवारी दिली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाविकास आघाडीकडून दत्ता गोर्डे या भुमरेंच्या कट्टर विरोधकाला मैदानात उतरवले. दत्ता गोर्डे यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढताना संदीपान भुमरे यांना घाम फोडला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT