Devendra Fadnavis | Ajit Pawar | Eknath Shinde | Sharad Pawar| Uddhav thackeray | Nana Patole Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandgad Assembly constituency : चंदगडला गटबाजीचं ग्रहण, महाविकास आघाडीत दुफळी, युतीत बंडखोरी अटळ

Mahavikas Aghadi Vs Mahayuti : ऐनवेळी पक्षात आलेल्यांना उमेदवारी नको, अशी रीघ महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी ओढली आहे. तर, महायुतीतील नेत्यांमध्ये सध्या शांतता, असली तरी अंतर्गत आग धुसमूसत आहे.

Rahul Gadkar

आगामी विधानसभेच्या तोंडावर कोल्हापुरातील चंडगडमध्ये सर्वच गटातटात हालचाली वाढल्या आहेत. उमेदवार कोण असावा आणि कोण नसावा? या कारणावरून गटातटातील राजकारण बिघडू लागलं आहे.

लोकसभेला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीतील प्रत्येक इच्छुक उमेदवाराचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर, महायुतीत अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याने उमेदवारीचा पेच निर्माण होणार आहे.

ऐनवेळी पक्षात आलेल्यांना उमेदवारी नको, अशी रीघ महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी ओढली आहे. तर, महायुतीतील ( Mahayuti ) नेत्यांमध्ये सध्या शांतता, असली तरी अंतर्गत आग धुसमूसत आहे. दोन्ही बाजूला इच्छुकांच्या संख्येमुळे गटबाजीचं ग्रहण लागलं आहे. दोन्हीकडील नेते गठबंधन म्हणून एकत्र असले तरी आतापासून प्रत्येक नेत्याची तोंड वेगवेगळ्या दिशेला आहेत. त्याचे मूळ 'उमेदवारी'त असल्याचं स्पष्ट आहे.

आगामी विधानसभेला महायुती आणि महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याबाबत अजूनही शाश्वती नाही. मात्र, चंदगड विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी स्वतंत्र प्रचाराला सुरुवात केली आहे. स्थानिक भागात दौरे गाठीभेटी वाढवल्या असून विधानसभेसाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. मात्र, नव्या नेत्यांच्या 'एन्ट्री'नं महाविकास आघाडीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची गोची निर्माण झाली आहे.

विधानसभेचे माजी अध्यक्ष स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या नंदाताई बाभुळकर, वंचितमधून आलेले ए.पी पाटील यांना महाविकास आघाडीतून विरोध होत आहे. महाविकास आघाडीतीलच नेत्यांना उमेदवारी द्या, असा आग्रह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. राष्ट्रवादीतर्फे (शरदचंद्र पवार ) डॉ. नंदिनी बाभुळकर, अमर चव्हाण, शिवप्रसाद तेली, काँग्रेसतर्फे गोपाळराव पाटील, अप्पी पाटील, विद्याधर गुरबे, शिवसेनेकडून (ठाकरे गट) सुनील शिंत्रे इत्यादी चेहरे विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असणारे राष्ट्रवादीचे चंदगडचे आमदार राजेश पाटील, भाजकडून शिवाजीराव पाटील, संग्राम कुपेकर हे दोघेही आमदारकीच्या तयारीला लागले आहेत. महायुती एकत्र लढण्याचा निर्णय झाल्यास विद्यमान आमदार म्हणून राजेश पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळू शकते. चंदगडमध्ये शिवसेनेकडून (शिंदे गट) कोणी इच्छुक अद्याप समोर आलेले नाहीत.

पण, भाजपकडून किंवा बंडखोरी करण्याची शक्यता असणारे शिवाजीराव पाटील हे राजेश पाटील यांच्या विरोधात पुन्हा एकदा मैदानात उतरू शकतात. लोकसभा निवडणुकीत राजेश पाटील, शिवाजीराव पाटील आणि संग्राम कुपेकर यांनी स्वतंत्र मेळावे घेत आपली ताकद दाखवून दिलेली आहे. तसेच, नुकत्याच झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा मतदारसंघ भाजपकडे घ्यावा, अशी मागणी स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते उमेदवारी कशी मिळवता येईल आणि दुसऱ्याची उमेदवारी कशी कापता येते, यासाठी पडद्याआडून खेळी करत आहेत. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांना हाताशी धरून जिल्ह्यातील राजकारणासोबत राज्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या मनात घर करण्याची तयारी इच्छुकांनी आखली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT