Rahul Desai | Prakash Ambitkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Assembly Election 2024 : दोस्तीत कुस्ती! उमेदवारी जाहीर करत भाजपच्या नेत्यानं शिंदेंच्या आमदाराविरोधात ठोकला 'शड्डू'

Rahul Desai Vs Prakash Abitkar : भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर हे राधानगरी विधानसभा मतदार संघातील पारंपारिक राजकीय विरोधक आहेत.

Rahul Gadkar

Maharashtra Politics : राधानगरी विधानसभा मतदार संघात महायुतीत कलगीतुरा रंगला आहे. यातच भाजपच्या जिल्ह्याध्यक्षांनी आपली उमेदवारी जाहीर करून अधिक गुंता वाढवला आहे. राधानगरी विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये 'दोस्तीत कुस्ती' होताना पाहायला मिळत आहे.

भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपली उमेदवारी जाहीर करून आगामी विधानसभेला महायुतीतील चौथा उमेदवार आपण असल्याचे जाहीर केले आहे. राधानगरी मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर आमदार आहेत.

"राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहे. यामुळे स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे," असे आवाहन भाजपचे (Bjp) जिल्हाध्यक्ष व बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई यांनी केले. गारगोटी येथील संपर्क कार्यालयात आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

"मी निडणुकीच्या मैदानात उतरावे, अशी कार्यकर्त्यांसह मतदारांची भावना आहे. बजरंग देसाईंसह निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी निवडणूक लढविणार आहे. लवकर मतदारसंघात संपर्क दौरा सुरू करणार आहे," असं देसाई यांनी सांगितलं.

भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर हे राधानगरी विधानसभा मतदार संघातील पारंपारिक राजकीय विरोधक आहेत. नुकत्याच झालेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यात भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी भाजप धर्म न पाळता आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आदेश डावलून राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या पॅनलसोबत आघाडी केली होती. यातच राधानगरी मतदारसंघातून राहुल देसाई यांनी 'शड्डू' ठोकल्यानं विधानसभेपूर्वी महायुतीत ठिणगी पडली आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT