Vikramsinh Sawant, Vilasrao Jagtap sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali News : विक्रमसिंह सावंत - विलासराव जगताप यांच्यात श्रेयवाद; म्हैसाळ योजनेवरून काँग्रेस आक्रमक...

Vikramsinh Sawant आमदार विक्रमसिंह सावंत यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेला पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे शब्द पाळला आहे.

Anil Kadam

Sangali News : म्हैसाळ विस्तारित योजनेची 980 कोटींची निविदा मंजूर होताच काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत आणि विरोधी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यात श्रेयवाद उफाळून आला. विस्तारित योजनेचे श्रेय घेण्याचा फार्स विरोधकांनी करू नये. या योजनेसाठी आमदार सावंत यांनी मोठा संघर्ष केल्याने कामाची निविदा निघाली. केवळ आंदोलनाचा फार्स करून मीच योजना कशी मंजूर केली, असा आव आणणाऱ्यांनी आपली नौटंकी बंद करावी; अन्यथा काँग्रेस पक्ष जशास तसे उत्तर देईल, असा इशारा तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला.

काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत म्हैसाळ आर्वतनासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळात ठाण मांडून बसले. अनेक मंत्र्यांच्या भेटी घेत दुष्काळाचे नियोजन काटेकोर होण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर आताच दोन दिवसीय विशेष अधिवेशन झाले. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी मंत्री विश्वजित कदम, आमदार पी. एन. पाटील यांच्यासह भेट घेऊन विस्तारित योजनेचा प्रश्न गांभीर्याने मांडला.

फडणवीस यांच्याकडे आग्रही भूमिका मांडत ही निविदा प्रक्रिया तातडीने राबवण्याची विनंती केली. त्यांनीही तातडीने हा प्रश्न सोडवत प्रक्रियेला सुरवात करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले. त्यानंतर पुन्हा जलसंपदा विभागाच्या सचिवांची भेट घेत, निविदा प्रक्रियेचा आदेश काढून आमदार सावंत यांनी निविदा प्रक्रिया जाहीर करेपर्यंत पाठपुरावा केला. त्यामुळे आता जतमधील वंचित गावांचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.

आमदार सावंत यांनी सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेला पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे शब्द पाळला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील म्हणाले, स्वयंभू नेत्यांची आमदार विक्रम सावंत यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही. वास्तविक, या योजनेसाठी सर्वांचेच योगदान महत्त्वाचे आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी आवाहन केल्यानंतर काँग्रेसनेही प्रतिसाद दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, भाजपचा एक घटक असलेल्या तम्मनगौडा रवि यांनी आमदार सावंत यांच्यासह जगताप यांच्यावरही टीका केली. केवळ कामावर जाऊन फोटो काढणे, मंत्र्यांना निवेदन देणे, प्रसिद्धी मिळविल्याने कामे होत नसतात. त्यासाठी शासन दरबारी आवाज उठविणे, रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. न केलेल्या योगदानाचे श्रेय स्वार्थासाठी घेऊन राजकारण करू नये, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे विस्तारित योजनेच्या निविदे वरून काँग्रेस भाजप नेत्यांमध्ये वादाला तोंड फुटल्याचे स्पष्ट झाले.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT