firing news.jpg sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Firing in Pune : पुण्यात गोळीबाराचा थरार! चेष्टा मस्करीतून मित्रानेच झाडली गोळी, आरोपीला अटक

Bharati University Police Station : पुणे आज (ता.16) गोळीबाराच्या घडनेनं हादरले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सिंहगड कॉलेज परिसरात मित्रांच्या चेष्टा-मस्करीनंतर उफाळलेल्या वादामुळे हा प्रकार घडला.

Aslam Shanedivan

Pune News : पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयातील परिसरात मित्रांमध्ये चेष्टा-मस्करीतून वाद उफाळला. मित्रानेच गावठी कट्ट्यातून मित्रावर गोळीबार केल्याने तो जखमी झाला आहे. सध्या जखमीवर रूग्णालयात उपचार सुरू असून भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार बुधवारी (ता.15) रात्री घडला असून निलेश संतोष जाधव (वय-21 रा. सिंहगड महाविद्यालय परिसर) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. तर जखमी असणाऱ्या मित्राचे नाव करण गजलमल असे आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बब्या उर्फ निलेश आणि करण हे मित्र आहेत. करण सेल्समनचे काम करतो. तर निलेष कोणताही कामधंदा करत नाही. बुधवारी रात्री आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात निलेश, करण आणखीन एक अल्पवयीन एकत्र आले होते.

यावेळी ते तिघेही मोबाईलवर गेम खेळत होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादातून निलेश याने गावठी कट्ट्यातून करणवर गोळी झाडली. ही गोळी करमच्या खांद्याला लागली. यामुळे तो जखमी झाला आहे.

जखमी करणला अल्पवयीन मुलाने नागरिकांच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले. तेथूनच फिर्याद भारती विद्यापीठ पोलिसांना वर्दी देण्यात आली. यानंतर पोलिसांनी निलेशला ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. तर या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करत आहेत.

दरम्यान 2021 साली अशीच धक्कादायक घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली होती. येथे एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. भर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात मारेकऱ्यांनी ६ गोळ्या झाडत तरुणाची हत्या केली होती. तर ही घटना चंद्रभागा हॉटेल समोर घडली होती.

यानंतर पोलीसांनी अधिक तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. तर प्राथमिक तपासातून ती हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT