बातमीचा थोडक्यात सारांश :
मुंबईतील एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची तासभर चर्चा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
आदित्य ठाकरेंनी ‘एकजण गावी जाईल’ असा अप्रत्यक्ष टोला मारल्याने शिंदे गट आक्रमक झाला आहे.
शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर देत, "शिवसेना नेत्यांची अवस्था मुघलांच्या घोड्यांसारखी झाली आहे" असा खवखवीत घणाघात केला.
Satara News : सध्या राज्याच्या राजकारणात भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरेंना थेट निमंत्रण त्यापाठोपाठ भेट आणि आता मुंबईतील एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यात झालेली तासभार चर्चा आता विविध राज्यातील राजकारण तापवत आहे. अशातच आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता, आमच्या भेटीच्या बातम्यांमुळे एक व्यक्ती गावी जाईल, चाललंय ते चालू द्या असे म्हणत त्यांना टोला लगावल्याने शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. याच मुद्द्यावर शिवसेना नेते, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आदित्य ठाकरेंसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर निशाना साधला आहे. त्यांनी शिवसेना नेत्यांची आवस्थाही मुघलांच्या घोड्या सारखी झाली असून त्यांना आमचे साहेबच सगळीकडे दिसतात, असा टोला लगावला आहे. (Fadnavis and Aditya Thackeray’s secret meeting triggers political storm as Shambhuraj Desai slams Uddhav faction with Mughal horse remark)
अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेच्या बाकावर या असे निमंत्रण दिले. त्यानंतर उद्धव यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर आता मुंबई वांद्र्यामधील सोफिटेल हॉटेलमध्ये फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीने नव्या राजकीय चर्चांना उत आला आहे. फडणवीस आणि आदित्य ठाकरे भेटीच्या चर्चा सुरू झाल्यानंतर यावर आदित्य यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी, आमच्या भेटीच्या बातम्या मी ऐकतोय. आता त्या बातम्या बघून एक व्यक्ती गावी जाईल, चाललंय ते चालू द्या असं म्हणत एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. ज्यावर शंभूराज देसाई यांनी थेट हल्लाबोल केला आहे.
शंभूराज देसाई यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा दाखला देत संताजी आणि धनाजी त्यांचे शूर सरदार होते. मुघलांची घोडी तळ्यामध्ये पाणी प्यायला जरी गेली तरी तेथे त्यांना हे दोन शूर सरदार दिसायचे. पण आता अशीच अवस्था उबाठा नेत्यांची झाली आहे. त्यांना सगळीकडे आमचे साहेबच दिसतात. मात्र आता त्यांनी जास्त नये. त्यांच्यापेक्षा जास्त बोलण्यासारखं आमच्याकडे आहे. नितेश आणि नीलेश राणे नेहमी म्हणत असतात अनेक गोष्टींची चौकशी करा. यामध्ये कोणाचे कुठे संबंध आहेत हे उघड होईल. त्यामुळे ते सतत बोलू लागल्यास त्यांचे पाय अधिकच खोलात जातील असाही इशारा त्यांनी आदित्य ठाकरेंना यावेळी दिला आहे.
यावेळी शंभूराज देसाई यांनी कृषिमंत्री कोकाटे यांच्या रम्मी गेमवर खेळण्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, ते जर मोबाईलवर गेम खेळत असतील तर हे योग्य नाही. सर्वांनीच विधिमंडळातील नियम पाळले पाहिजेत. पण कोकाटे स्वतः याचा खुलासा करतील, असे म्हटलं आहे. तर अंबादास दानवे यांच्या दोन्ही शिवसेना एकत्र येतील या आशेवर देखील त्यांनी प्रतिक्रिया देताना, अशी आशा व्यक्त कोणाही करत असतोच. पण आमच्यात अशी कोणतीही चर्चा नाही. तर आमचे मंत्री प्रताप सरनाईक हे कोणत्या अर्थाने शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील हे बोलले याची माहिती नाही. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय हे समजणार देखील नाही, त्यांच्याशी चर्चा केल्यावर भाष्य करणे योग्य ठरेल असेही त्यांनी म्हटलं आहे.
तर यावेळी त्यांनी शिवसेनेकडून (ठाकरे) होणाऱ्या जादूटोणा टीकेवर पलटवार करताना, आम्ही जर जादूटोणाकरून 200 जागा जिंकल्या असतील तर त्यांनी लोकसभेला काय केलं. त्यांनी काय दहा डायनासोर कापले होते का? असा सवाल केला आहे. तसेच जर जादूटोणाकरून जागा निवडून येत असत्या तर आपण खोल्या भरून पैसे ठेवले असते. जादूटोण्यावरून उबाठा गटाच्या नेत्यांनी बोलणे म्हणजे आता यांची परिस्थिती किती केविलवाणी झाली याचा अंदाज येतो असेही ते म्हणाले.
1. फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट कुठे झाली?
मुंबईतील एका खासगी हॉटेलमध्ये दोघांची गुप्त चर्चा झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे.
2. आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय वक्तव्य केलं?
त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता, “आमच्या बातम्यांमुळे एकजण गावी जाईल, चाललंय ते चालू द्या” असं म्हणत अप्रत्यक्ष टोला लगावला.
3. शंभूराज देसाई यांनी काय प्रत्युत्तर दिलं?
देसाई यांनी उद्धव गटावर टीका करताना म्हटलं की, “शिवसेना नेत्यांची अवस्था मुघलांच्या घोड्यांसारखी झाली आहे, त्यांना आमचे साहेबच दिसतात.”
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.