Sujay Vikhe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Politics : वाळू चोरांना लगाम लावला, आता दूध भेसळखोरांची वेळ; सुजय विखेंचा रोख कोणाकडे?

Sujay Vikhe On Milk Adulteration Issues : भाजप खासदार डॉ. सुजय विखेंचा इशारा...

Pradeep Pendhare

Maharashtra Politics Latest News : वाळू चोरांना लगाम लावला. आता दुधात भेसळ करणाऱ्यांना रोखण्याची वेळ आली आहे. समाजासाठी ज्या गोष्टी घातक ठरतात, त्या बंद करण्याचे काम राज्य सरकार करेल. काही दूध उत्पादक दोन गायी संभाळतात, पण 50 लिटर दूध घेऊन येतात. ते कसे? यासाठी दूध देणाऱ्या गायींचे टॅगिंग करून ऑनलाईन नोंदणी करणार असून या दुधाला सरकार अनुदान देणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.

पाथर्डी तालुक्यातील वाळुंज, आगासखंड, शेकटे, फुंदे टाकळी आणि येळी याठिकाणी खासदार विखे व आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नातून झालेल्या विकासकामांचा प्रारंभ आणि उद्घाटन कार्यक्रमात खासदार विखे बोलत होते. भगवानगड व 46 गावांच्या पाणी योजनेसाठी आमदार राजळे यांनी ही योजना मंजूर करून घेतल्याबद्दल त्यांचा येळी गावात नागरी सत्कार करण्यात आला. रामगिरी महाराज, अभय आव्हाड, माणिक खेडकर, अमोल गर्जे, अजय रक्ताटे, प्रतीक खेडकर, सरपंच शुभांगी जगताप, अजित देवढे, प्रदीप पाटील उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, "भेसळीच्या दुधामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान होत आहे. घातक भेसळीचे दूध रोखण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे. राज्य सरकारने गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान जाहीर केले असून त्यासाठी शेतकरी व दूध उत्पादकांनी आपल्या गायीचे टॅगिंग करून ऑनलाईन केल्यानंतर अनुदान मिळणार आहे. दूध भेसळ रोखण्यासाठी दूध उत्पादकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे. यातून दूध भेसळीवर नियंत्रण येईल. दुधाची भेसळ थांबवण्यासाठी आपण संकल्प केला आहे. ते संपवण्यासाठी आपले हे पाऊल असून पुढच्या पिढीला चांगला आयुष्य द्यायचे आहे". कुठलीही गोष्ट जर समाजासाठी घातक ठरत असेल तर ते बंद करण्याची खरी शिकवण लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून मिळाली आहे, असेही खासदार विखे यांनी म्हटले.

'पाथर्डी तालुक्याच्या प्रत्येक जनतेच्या मनामध्ये काय आहे ते आम्ही ओळखत असून जनता कोणाबरोबर आहे हे मतपेटीतून येणाऱ्या निवडणुकीत दिसेल. कोण काय करू शकतो, कुणी केले आणि कोणात काम करण्याची दानत आहे, या गोष्टीबाबत पाथर्डी तालुक्याची जनतेला सर्व परिचित आहे', असेही खासदार सुजय विखे यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोनिका राजळेंचा विरोधकांना चिमटा

भगवानगड व 46 गावांची पाणी योजना याचा विरोधकांनी इतिहासच बदलून टाकला आहे. योजना मंजूर करण्यासाठी प्रत्यक्षात सुरुवात पंकजा मुंडे मंत्री असताना पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर यांच्या माध्यमातून झाली. त्यामुळे कुणी काही केले आणि ऑनलाईन पद्धतीने या भगवानगड पाणी योजनेचे उद्घाटन जरी केले असले तरी भगवानगड पाणीयोजना मंजूर कुणी केली हे सर्वांना माहित आहे, असे आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांनी टोला मारला. भगवानगड पाणी योजनेचे खरे प्रणेते संजय बडे असून प्रत्येक गावातील सरपंच नागरीक यांनी योजना मंजूर होण्यासाठी परिश्रम घेतल्याचेही आमदार राजळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT