Pradhan Mantri Awas Yojana Sarkarnama
महाराष्ट्र

PM Awas Yojana : घरकुल हवेय? सरकारचा मोठा निर्णय, PM आवास मिळवण्याची सुवर्णसंधी! नवीन सर्व्हे अभियान सुरू; जाणून घ्या कसं मिळणार घर!

How to apply for PM Awas Yojana 2026 : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन सर्व्हे अभियान सुरू झाले आहे. पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि घरकुल मिळवण्यासाठी आवश्यक माहिती जाणून घ्या.

Rashmi Mane

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वतःचे घर मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण कुटुंबांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पश्चिम बंगाल सरकारने पात्र लाभार्थ्यांची निवड अधिक पारदर्शक आणि अचूक पद्धतीने करण्यासाठी नवीन सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे घरकुलासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना आता थेट स्वतःची माहिती नोंदवता येणार असून मध्यस्थांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे.

योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रशासनाने डिजिटल पद्धतीचा अवलंब केला आहे. इच्छुक नागरिकांना त्यांच्या मोबाईलमध्ये ‘AwaasPlus 2024’ आणि ‘AadhaarFace RD’ हे अॅप डाउनलोड करून आधार आधारित पडताळणी पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. अर्ज मिळाल्यानंतर अधिकृत सर्वेक्षक संबंधित कुटुंबाच्या घरी भेट देऊन दिलेल्या माहितीची तपासणी करतील आणि पात्रता निश्चित करतील.

ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे स्मार्टफोन किंवा तांत्रिक सुविधा नसल्याचे लक्षात घेऊन प्रशासनाने घरपोच सर्वेक्षणाची सुविधाही उपलब्ध केली आहे. सर्वेक्षण पथके गावोगावी जाऊन पात्र कुटुंबांची माहिती गोळा करणार आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे कोणताही गरजू नागरिक योजनेपासून वंचित राहणार नाही.

लाभार्थी निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी तीन टप्प्यांची पडताळणी यंत्रणा लागू करण्यात आली आहे. सर्वेक्षण झालेल्या किमान 10% कुटुंबांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. याशिवाय ब्लॉक स्तरावरील अधिकारी स्वतंत्रपणे 5% अर्जांची पडताळणी करतील, तर जिल्हा स्तरावरून 2% अर्जांची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल. या प्रक्रियेमुळे चुकीची माहिती, अपात्र लाभार्थी किंवा अन्य अनियमितता रोखण्यास मदत होणार आहे.

प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीत सर्वेक्षण पथके नियुक्त केली असून लाभार्थी शोध मोहीम सुरू झाली आहे. हे सर्वेक्षण 20 July 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या नव्या प्रणालीमुळे पात्र कुटुंबांची निवड अधिक सुलभ होईल आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ खऱ्या गरजूंना मिळण्याचा मार्ग अधिक मजबूत होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT