Tribal Certificate Scam sarkarnama
महाराष्ट्र

Tribal Certificate Scam : मराठा तरुणांना आदिवासी दाखल्याचे वाटप, उपायुक्त चव्हाणांना विधानसभेतून दणका

Sangeeta Chavan Suspended : संगीता चव्हाण यांनी कनले यांचे रेकाॅर्डवर ते मराठा जातीचे असल्याचे पुरावे असताना देखील पावरा यांनी दिलेली कारणे दाखवा नोटीस चव्हाण यांनी रद्द केली.

Roshan More

Sangeeta Chavan Suspension : बोगस आदिवसी प्रमाणपत्र मिळवून आदिवसांच्या नोकऱ्या बळकावल्याचा आरोप सातत्याने केला जातो. त्यातच विधानसभेत मराठा समाजातील तरुणांना बोगस आदिवासी प्रमाणपत्र दिल्याचा प्रश्न उपस्थित केला केला होता. अखेर नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मराठा समाजातील तरुणांना बोगस आदिवासी प्रमाणपत्र करणाऱ्या उपायुक्त संगीता चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी सभागृहात निलंबनाची घोषणा केली.

आदिवासी विकास विभाग आयुक्तालयात उपायुक्त म्हणून संगीता चव्हाण या कार्यरत होत्या. शिवानी या महिलेने अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवल होते. तिचे काका लक्ष्मण कनले यांनी सरकारी आणि न्यायालयाची दिशाभूल करत मन्नेरवारलु या जमातीचे वैधताप्रमाणपत्र प्राप्त केले होते. हे प्रकरण अनुसूचित जमातीचे सहआयुक्त दिनकर पावरा यांच्याकडे आले असता त्यांनी हे प्रमाणपत्र रद्द का करू नये म्हणून कारणे दाखवा नोटीस दिली होती.

मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर सहआयुक्त म्हणून आलेल्या संगीता चव्हाण यांनी कनले यांचे रेकाॅर्डवर ते मराठा जातीचे असल्याचे पुरावे असताना देखील पावरा यांनी दिलेली कारणे दाखवा फेब्रुवारी 2023 नोटीस रद्द केली. आणि कनले यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले त्यातून कनले परिवारने उच्च शिक्षण आणि नोकरीत याचा फायदा घेतला.

मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर सहआयुक्त म्हणून आलेल्या संगीता चव्हाण यांनी कनले यांचे रेकाॅर्डवर ते मराठा जातीचे असल्याचे पुरावे असताना देखील पावरा यांनी दिलेली कारणे दाखवा फेब्रुवारी 2023 नोटीस रद्द केली. आणि कनले यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले त्यातून कनले परिवारने उच्च शिक्षण आणि नोकरीत याचा फायदा घेतला.

छत्रपती संभाजीनगर येथे जात पडताळणी समितीवर सहआयुक्त म्हणून काम करताना संगीता चव्हाण यांनी बोगस आदिवासी प्रमाणपत्र वाटप केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याची मागणी करत मार्च महिन्यात झालेल्या अधिवेशनात आदिवासी आमदारांनी प्रश्न उपस्थित करत चव्हाण यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली होती. त्यावेळी आदिवासी मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने आदिवासी आमदार समाधानी नव्हते. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात संगीत चव्हाण यांच्यावर कारवाईसाठी आमदार आक्रमक झाले होते. त्यामुळे मंत्री अशोक उईके यांनी अधिवेशनात संगीत चव्हाण यांचे निलंबन करण्याची घोषणा केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT