Maharashtra Assembly Elections  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Elections 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक महाराष्ट्र दौऱ्यावर; 28 सप्टेंबरला पत्रकार परिषद

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुका कधी होणार, यावर चर्चा सुरू आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं हरियाणाबरोबर होणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका पुढं ढकलल्या. यावरून महाविकास आघाडीने केंद्रातील आणि राज्यातील महायुती भाजप सरकारला वेळोवेळी आव्हान दिलं.

आता मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. तसंच 28 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

केंद्रीय निवडणूक (Election) आयोगाचं पथक 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर असताना, राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष, अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन आढावा घेणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रमाचं चित्र स्पष्ट होईल. तसंच निवडणूक कार्यक्रमांशी निगडीत असलेल्या अधिकाऱ्यांना सूचना आणि निर्देश देतील. केंद्रीय पथक दौऱ्यानंतर 28 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेणार असल्यानं, होणाऱ्या पत्रकार परिषदेकडं लक्ष लागलं आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयोग प्रत्येक राज्याचा आढावा दौरा करते. त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा असणार असून, त्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा नोव्हेंबरपर्यंतचा आहे. तत्पूर्वी नवं सराकर स्थापन होणं गरजेचं आहे. त्यामुळं आता महाराष्ट्राच्या निवडणुका लवकर जाहीर होतील, अशी शक्यता आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक हरियाणा आणि जम्मू-काश्मीरबरोबर (Jammu and Kashmir) होणं गरजेची होती. परंतु हरिणाया आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकींचा तारीख जाहीर झाली. पण महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकांची नाही. आता केंद्रीय पथक महाराष्ट्राचा दौरा करून पत्रकार परिषदेत काय जाहीर करते, याकडे लक्ष लागले आहे.

2019 ते 2024 मधील राजकीय स्थिती

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती 2019 ते 2024 या कालावधीत खूप बदलली आहे. राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या प्रयोगानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले. या दोन्ही पक्षाचे खटले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. राज्यात महायुती, महाविकास आघाडी, तिसऱ्या आघाड्यांचे राजकारण सुरू झालं आहे. महाराष्ट्रात 288 विधानसभा जागा असून, 2019 च्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 105, शिवसेने 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 आणि काँग्रेसने 44 जागा जिंकल्या होत्या.

'राष्ट्रपती राजवट'ची भीती

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पुढं ढकलल्याने राज्यात 'राष्ट्रपती राजवट' लावण्याची शक्यता महाविकास आघाडीमधील काँग्रेस नेत्यांकडून वारंवार व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती खूप बदलली. महायुती भाजपला लोकसभा निवडणुकीत धक्के बसलेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील सर्व्हे समोर येत असून, महायुती भाजपविरोधात अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढं ढकलली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT