Shivsena UBT Vs BJP : ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना भाजपने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील मोठा नेता भाजपच्या गळाला लागला असून त्यांनी आज मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
विदर्भातील वाशिमचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. या राजीनाम्याच्या दोनच दिवसांत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
ते एकटेच भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत तर त्यांच्यासोबत तब्बल 250 कार्यकर्ते, पदाधिकारी देखील भाजपचे कमळ हाती घेणार असल्याचे सांगितले जात होते. त्याप्रमाणे मोठ्या संख्येने वाशिमधील ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, सदस्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा झाला. सुरेश मापारी यांनी काल आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर ते कार्यकर्त्यांसह कालच रात्रीच मुंबईत दाखल झाले होते.
वाशिम जिल्ह्यातील सुरेश मापारी हे मोठे नेते मानले जातात. ते माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांनी अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापतिपद भुषवले आहेत. तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशी पदे भूषवली आहेत. वाशिमच्या ग्रामीण भागात त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. अशा स्थितीत त्यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची शिवसेना सोडल्याने त्यांना पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
स्थानिक खासदार संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर सुरेश मापारी नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे ते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मापारी यांच्याकडून जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे काढून घेत बालाजी वानखेडे यांच्यावर जबाबदारी टाकली. त्यानंतर मापारी यांनी राजीनामा देत आज भाजपमध्ये प्रवेश केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.