Jayant Patil & Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP On Ajit Pawar : ‘घरात जे घडतं, ते चव्हाट्यावर मांडण हे चांगल्या मुलाचे लक्षण नव्हे’

Ajit Pawar & Sharad Pawar Politics, Jayant Patil Criticized Ajit Pawar Group-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाव न घेता अजित पवार यांना चिमटा घेतला.

Sampat Devgire

Maharashtra Politics : सध्या काही मंडळी खासगी चर्चा चव्हाट्यावर मांडू लागले आहेत. त्यातच ते वेळ घालवत आहेत. मात्र घरात जे घडतं, ते चव्हाट्यावर मांडणं हे चांगल्या मुलाचं लक्षण नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केली. (Sharad Pawar`s NCP State President Jayant Patil criticized State Government on Farmers issues)

शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नांवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली.

पाटील यांनी मोर्चाला संबोधित केले. ते म्हणाले, हा मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आहे. यामध्ये राजकीय भाष्य केले, तर शेतकऱ्यांचे प्रश्न भरकटतील. त्यामुळे मला इतरांसारखे राजकीय भाष्य करायचे नाही.

आज कर्जत येथे अजित पवार यांच्या गटाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतील वक्तव्याच्या अनुषंगाने ते म्हणाले, एखादी खासगीत चर्चा झाली, तर ती चव्हाट्यावर न्यायची नसते. अशी चर्चा चव्हाट्यावर घेऊन जाणे हे चांगल्या मुलाचे लक्षण नाही.

ते म्हणाले, सध्याचे राज्य सरकार गोंधळ निर्माण करते आहे. एक मंत्री वेगळे बोलतो. दुसरा आणखी काही तरी बोलतो. तिसरा म्हणते त्याने सांगितले, तर राजीनामा देतो. हे बरोबर नाही. मुख्यमंत्र्यांनी एखादा निर्णय घेतला, तर त्यावर अन्य सर्व मंत्र्यांनी ठाम राहिले पाहिजे, पण तसे घडताना दिसत नाही.

याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवणार हे त्यांनीच सांगावे. आरक्षण देणार, तर कसे देणार?. कोणाच्या हिश्श्याचे देणार? कोणाच्या आरक्षणाला धक्का लावणार का?. फसवणूक होईल असा गोंधळ करू नये. मात्र, या सरकारमध्येच समन्वय नाही, अशी टीका पाटील यांनी केली.

या वेळी आमदार सुनील भुसारा, मोर्चाचे समन्वयक दत्तात्रय पाटील, माजी आमदार शिरीष कोतवाल, कोंडाजी मामा आव्हाड, डॉ. सयाजी गायकवाड, माजी आमदार दीपिका चव्हाण, नितीन भोसले, पुरषोत्तम कडलग, शेखर माने, इंद्रजित गावित, भास्कर भगरे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT