Amhednagar Collector Office Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar News : जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय अमान्य ; तलाठी, महसूल कर्मचाऱ्यांनी उचलले पाऊल...

Kam Band Andolan : वैध गौण खनिज उत्खननास प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत नायगाव येथील तलाठी नंदकुमार नागापुरे व मंडळाधिकारी बी.एस. वायखिंडे यांनी कार्यवाही केली नाही.

Pradeep Pendhare

Nagar News: श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनावर प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा ठपका ठेवत मंडलाधिकारी आणि तलाठी यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कारवाई केली.

मंडलाधिकारी बी.एस.वायखिंडे आणि कामगार तलाठी नंदकुमार नागापुरे यांना निलंबित केले. या कारवाईच्या निषेधार्थ तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून (ता.18) कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

जिल्हा गौण खनिज विभागाचे वसीम सय्यद यांच्या पथकाने रविवारी मध्यरात्री एक वाजता मातुलठाण येथील हनुमान मंदिराजवळ गोदावरी नदीपात्रालगत अनधिकृत वाळू वाहतूक करताना ट्रक पकडला. त्यामध्ये सहा ब्रास वाळू होती.

याठिकाणी होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननास प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत नायगाव येथील तलाठी नंदकुमार नागापुरे व मंडळाधिकारी बी.एस. वायखिंडे यांनी कार्यवाही केली नाही.

आदेशाचा भंग केला केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath ) यांनी या दोघांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली. तसा आदेशच त्यांनी काढला आहे. मात्र,अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारा हा ट्रक पकडून त्याचा पंचनामा करून तहसील कार्यालयात आणून लावण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ट्रकवरील वाहन चालक अनिल जाधव (रा. वाईपांगरी, ता.सिन्नर) आणि ट्रक मालक मनोज साबदे, मंगेश वाणी (रा. नांदुर्खी, ता.राहाता) असल्याचे पंचनाम्यात नमूद केल आहे. हा पंचनामा त्यादिवशी पहाटे तीन वाजेच्या सुमारास पूर्ण करून पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय येथे दाखल करण्यात आला आहे.

असे असून देखील या दोघांवर निलंबनाची अन्यायकारक कारवाई झाल्याचे महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने म्हणणे आहे. या कारवाईचा निषेध करण्यासाठी संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. प्रांताधिकारी यांना देखील संघटनेने निवेदन दिले आहे.

एकतर्फी कारवाई

क्षेत्रिय स्तरावर काम करताना संबंधित तलाठी व मंडळाधिकारी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी कोणत्या आहेत, या जाणून घेतल्या जात नाही. मंडलाधिकारी बी.एस.वायखिंडे आणि कामगार तलाठी नंदकुमार नागापुरे यांच्यावर कारवाईपूर्वी कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नाही.

त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा घेण्यात घेतलेला नाही. त्यामुळे त्यांचे निलंबन हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाविरोधात आहे. जोपर्यंत त्यांचे निलंबन विनाअट मागे घेतले जात नाही तोपर्यंत श्रीरामपूर उपविभागातील सर्व तलाठी, मंडळाधिकारी व कोतवाल यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलन सुरू ठेवणार आहेत.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT