Gulab Keshav Nikam End-of-Life Case | Maharashtra Latest News sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Farmer End Life : कांद्याला भाव मिळेना, कर्ज वाढलं; शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली, चांदवडकर हळहळले!

Chandwad Farmer Gulab Nikam: शेतमालाला भाव मिळत नसल्याने कर्ज वाढलं त्यामुळे मानसिक स्थिती खालवलेल्या शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आपले जीवन संपवले.

Sampat Devgire

Farmer Issue : राहुड (चांदवड) येथील गुलाब केशव निकम या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आपले जीवन संपवले. अवघ्या दोन दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून चांदवडमध्ये कांद्याला भाव मिळावे म्हणून आंदोलन केले जाणार होते. त्यापूर्वीच शेतकऱ्याने आपले जीवन संपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

रवींद्र निकम यांनी सांगितले की, गुलाब हे माझे मोठे बंधू आहेत. कांदा आणि शेतमालाला भाव नाही, रोजगार नाही, मुलांचे लग्न होत नाही त्यामुळे गेले पंधरा दिवस ते नैराश्यात होते. काल रात्री त्यांनी आपले जीवन संपवले.

गुलाब यांचा मुलगा चेतन निकम यांनी सांगितले की, मागील 15 दिवसांपासून माझ्या वडिलांचे मानसिक संतुलन बिघडले होते. आठ नऊ लाख रुपये कर्ज आहे. कांद्याला भाव नाही, शेतमालाला भाव नाही त्यामुळे कर्जाला कंटाळून आत्महत्या केली.आम्ही तिघे भाऊ आहोत.

भाववाढीसाठी आंदोलन होणार

गेल्या दहा दिवसांपासून कांद्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी निराश झाला आहे. पार्श्वभूमीवर विरोधकांनी दोन दिवसांनी चांदवड येथे आंदोलनाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेश शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आलीआहे.

खासदार भगरे घेणार पीडीत कुटुंबाची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार भास्कर भगरे म्हणाले, चांदवड तालुक्यात दुष्काळ आणि कांद्याचे कोसळलेले दर ही समस्या अत्यंत तीव्र बनली आहे. या संदर्भात दहा दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्र्यांना भेटून पत्र दिले होते. शासनाने हस्तक्षेप करावा अशी विनंती केली होती. टोकाचे पाऊल उचलणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT