Jalgaon Crime Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Crime : जळगावात हद्दच झाली ! पोलीस हॉलमध्येच कंबरेला पिस्तूल लावून तरुणाचा डान्स अन् पैशांची उधळण

Jalgaon youth gun dance : जळगाव पोलीस मुख्यालयाच्या परिसरात तेही जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाजवळ असा प्रकार घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon News : जळगाव शहरात पोलिस मुख्यालय परिसरातील पद्मालय पोलिस हॉलमध्ये दिवाळी निमित्त आयोजित एका कार्यक्रमात एका तरुणाने कमरेला पिस्तूल लावून नाचत चक्क पैशांची उधळण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिस मुख्यालयाच्या शेजारी आणि पोलिस हॉलमध्येच हा प्रकार घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलिस मुख्यालय जवळील पोलिस हॉलमध्ये सोमवारी (ता. २०) सायंकाळच्या समारास 'दिवाळी सुफी नाइट' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भर कार्यक्रमात एका तरुणाने परवानाधारक पिस्तूल कंबरेला लावून नाचत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील काही न्यूज पोर्टलच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान संशयित पीयूष मणियार याने आपल्या परवानाधारक पिस्तूलसह स्टेजजवळ नाचत मध्य प्रदेशातील गायक शफिक मस्तान यांच्या अंगावर पैशांची ओवाळणी करून उधळण केली. दरम्यान प्रकाराचा व्हीडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

खुद्द पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या सभागृहात अशाप्रकारे दहशत करण्याचा प्रकार घडला. पोलिसांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडला. जळगावमधील सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी या प्रकरणी थेट पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर संबधित तरुणावर जळगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

व्हायरल व्हिडीओची पोलिसांनी चौकशी केली. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या फिर्यादीवरून संशयित पीयूष मणियार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी या प्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे अधिक तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT