Sahashram Koreti Sarkarnama
विदर्भ

Ashok Chavan News : राजीनामा सत्राबाबत काय म्हणाले आमदार सहशराम कोरोटे?

MLA Korete News : त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे आमदार कोरोटे म्हणाले आहेत.

अभिजीत घोरमारे

Ashok Chavan News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षासह आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे इतर आमदारही आपला राजीनामा देऊन काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेले आहे. दरम्यान, या राजीनामा सत्रामध्ये गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार सहशराम कोरोटे यांचा समावेश असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे.

या चर्चांना उधाण आल्यानंतर त्यांनी ‘सरकारनामा’कडे खुलासा केलेला आहे. आपण काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते असून, आपण काँग्रेस सोडून जाणार नसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली आहे. अशोक चव्हाण आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे कळले आहे. मात्र, त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे आमदार कोरोटे म्हणाले आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने आपल्याला भरपूर काही दिल्याने आपण काँग्रेससोबत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अशोक चव्हाणांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे जाऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. चव्हाण दिल्लीत जाऊन भाजप प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील आणखी पाच ते सहा आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या आमदारांमध्ये विश्वजित कदम, अमर राजूरकर, जितेश अंतापूरकर, परिणिती शिंदे, माधव जवळकर, अमित झनक, अस्लम शेख, आमदार सहशराम कोरोटे यांची नावे घेतली जात आहेत. याच यादीतील आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार सहशराम कोरोटे यांच्या नावाची सध्या जोरात चर्चा होत आहे. मात्र, सहशराम कोरोटे यांनी याला नकार दिला आहे.

केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह 15 फेब्रुवारीला विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. अशात शाह यांच्या दौऱ्याच्या काळात महाराष्ट्रात अनेक मोठे राजकीय भूकंप होतील, असे संकेतही मिळू लागले आहे. त्यामुळे आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत कोण कोण जातात, याचा खुलासा लवकरच होणार आहे.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT