Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul Gandhi Sarkarnama
विदर्भ

Nana Patole : काँग्रेसचे नाना पटोले आंबेडकर समाजविरोधी; आंबेडकरी चळवळीतील नेत्याचा खळबळजनक आरोप

Vidarbha Congress News : काँग्रेसला आंबेडकरी समाजाची मते हवी आहेत. परंतु, या प्रवर्गाला नेतृत्व देण्याची संधी मिळते तेव्हा काँग्रेस ती नाकारते. डोक्यावर संविधान ठेवून आंबेडकरी समाज काँग्रेसला साथ देईल, असा भ्रम काँग्रेसला झाला आहे. परंतु...

Deepak Kulkarni

Bhandara News : भंडारा विधानसभा क्षेत्र अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसमधील आंबेडकरी विचारधारा असलेल्या उमेदवाराला मिळणे अपेक्षित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आंबेडकरी कार्यकर्त्याला संधी दिली नाही. काँग्रेसला मतांसाठी आंबेडकरी समाज हवा असतो. राजकारणात संधी देताना त्यांना याचा विसर पडतो, असा आरोप आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे.

भंडारा येथे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते परमानंद मेश्राम, प्राचार्य पूरण लोणारे, प्राणहंस मेश्राम, अ‍ॅड. निलेश डहाट, प्रज्ञा नंदेश्वर, भीमराव मेश्राम यांनी भंडारा येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. नाना पटोले यांच्यावर ताशेरेही ओढले. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा निषेध नोंदविताना परमानंद मेश्राम म्हणाले, अनेक दशकांपासून पटोले आंबेडकरी समाजविरोधी भूमिका घेत आहेत. 

इतक्या वर्षांनंतरही आंबेडकरी समाज पटोलेंचे षडयंत्र समजू शकला नाही. जगाने दखल घेतलेल्या खैरलांजी हत्याकांडावेळी पटोले यांनी खैरणा ते खैरलांजी अशी पदयात्रा काढून आंबेडकरी समाजाविरोधी भूमिका घेतली होती याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

काँग्रेसला आंबेडकरी समाजाची मते हवी आहेत. परंतु, या प्रवर्गाला नेतृत्व देण्याची संधी मिळते तेव्हा काँग्रेस ती नाकारते. डोक्यावर संविधान ठेवून आंबेडकरी समाज काँग्रेसला साथ देईल, असा भ्रम काँग्रेसला झाला आहे. परंतु, आमची संधी नाकारणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशाराही मेश्राम यांनी दिला.

भंडारा विधानसभा क्षेत्रात अनुसूचित जाती प्रवर्गाचे मतदार ९० हजारांपेक्षा अधिक आहेत. परंतु, आंबेडकरवादी विचारधारा असलेल्या व्यक्तीला काँग्रेस उमेदवारी देत नाही. फक्त जातीय राजकारण करून विशिष्ट जातीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले जवळ करतात. अशा जातीयवादी नेत्यांना समाजाने त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहनही मेश्राम यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT