Narendra Modi Sarkarnama
विदर्भ

Suryodaya Project : दिल्लीत जाहीर केलेली योजना आठवड्यातच पोचली गल्लीत !

Central Government's Scheme : ‘सुर्योदय’ प्रकल्पातून महाराष्ट्रातील सात जिल्हे उजाळणार.

Sachin Deshpande

Suryodaya Project : अयोध्येत 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभु श्रीरामांच्या मंदिराचे लोकार्पण केले. त्यानंतर त्यांनी देशात सौर उर्जेच्या संदर्भात ‘सुर्योदय’ ही नवी योजना जाहीर केली. दिल्लीत 22 जानेवारी रोजी जाहिर केलेली योजना हा महिना संपण्यापूर्वी आता गल्लीत पोहचली आहे. महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत ही योजना राबविली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मुख्य म्हणजे सौर पॅनलसाठी 40 टक्के अनुदान या योजनेत देण्यात येणार आहे. या योजनेत मध्यवर्गीयांना मोठा दिलासा वीज देयकात मिळणार असल्याने त्वरीत या योजनेसाठी लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. त्याच बरोबर अनेकांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहणारा उन्हाळा या ‘सुर्योदय’ प्रकल्पाने गारवा देणारा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 'सुर्योदय' योजनेत राज्यातील सात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील हजारो घरांच्या छतावर सौर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. केंद्र शासनाकडून सौर पॅनेलसाठी 40 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. देशात एक कोटी घरांच्या छतांवर सौर पॅनेलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असलेली 'सुर्योदय' योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. योजनेत राज्यातील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, नागपूर आणि अकोला जिल्ह्याचा समावेश आहे.

सौर ऊर्जा ही स्वच्छ आणि प्रदूषणविरहित ऊर्जेचा उत्तम स्त्रोत आहे. या योजनेत ग्राहकांना केंद्र शासनाकडून 40 टक्के अनुदान मिळते. तीन किलोवॅटपर्यंत क्षमतेचे पॅनेल बसविण्यासाठी सुमारे 1 लाख 57 हजार खर्च येतो व त्यामध्ये सुमारे 54 हजार पर्यंत अनुदान मिळणार आहे. घरगुती देयकात मोठी बचत, घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना योजनेचा लाभ घेता येईल.

1 ते 3 किलोवॅटपर्यंत 40 टक्के अनुदान, 3 किलोवॅटपेक्षा अधिक ते 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्के अनुदान, सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेसह निवासी गृहनिर्माण संस्था या ग्राहकांना 20 टक्के अनुदान मिळते. वापरात न येणारी आणि शिल्लक वीज महावितरणकडून प्रति युनिटप्रमाणे विकत घेतली जाते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो.पण त्याचा उपयोग पुढे दीर्घकाळासाठी होत राहतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सौर ऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांनी 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट क्षमतेचे पॅनेल्स बसविले तर वीस टक्के अनुदान मिळते. इच्छूकांना महावितरणच्या mahadiscom.in/ismart या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल. सुर्योदय योजनेत छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी कोणत्याही बँकेकडून हप्त्यावर कर्ज उपलब्ध होऊ शकते. सौर ऊर्जानिर्मितीने वीज देयकाच्या वाचणाऱ्या पैश्यातून कर्जफेड शक्य आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक सुलभरीतीने आर्थिक भुर्दंडाविना ही सुविधा वापरता येणार आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT