Ashish Deshmukh Meet nitin Gadkari :  Sarkarnama
विदर्भ

Ashish Deshmukh Meet Gadkari : काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख गडकरींच्या भेटीला; भाजप प्रवेशानंतर काटोल की सावनेर? चर्चांना उधाण..

Ashish Deshmukh Meet Gadkari : उद्या देशमुखांचा भाजप प्रवेश..

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News : माजी आमदार आशिष देशमुख लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने पक्षविरोधा वक्तव्य केल्याचा ठपका ठेवून आशिष देशमुख यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन केले होते. आशिष देशमुख हे रविवारी (दि.18 जून) नागपूरमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. (Ashish Deshmukh Meeting with nitin Gadkari)

दरम्यान माजी आमदार राहिलेल्या आशिष देशमुख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी गडकरींच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. उद्या आशिष देशमुख भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत. पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर देशमुख-गडकरी भेट महत्त्वपूर्ण मानले जात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आशिष देशमुखांची यापूर्वीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट आणि आता गडकरींची भेट महत्त्वाची आहे.

देशमुखांचा भाजपप्रवेश -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आशिष देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करत होते. त्यामुळे त्यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने त्यांची पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी केली होती.

दरम्यान, आशिष देशमुख यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काटोल किंवा सावनेर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आशिष देशमुख यांच्या घरवापसीने भाजपची नागपूरमध्ये काही अंशी राजकीय ताकद वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT