मुंबई : कोट्यावधीच्या जमीन घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली असून ९ फेब्रुवारीपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे. प्रवीण राऊत हे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. (Shivsena) यावरून आता भाजपने थेट संजय राऊत यांच्यावरच निशाणा साधला आहे. (Atul Bhatkhalkar)
आमदार तथा प्रदेश प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी `प्रवीण राऊतशी तुमचे संबंध काय? ते जगाला सांगा, अशा शब्दात संजय राऊत यांना आव्हान दिले आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी वाझेंना पुन्हा कामावर घेण्यासाठी आपल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परबांचा दबाव होता, असा आरोप करत खळबळ उडवून दिली.
तर माजी मुख्य सचिवांनी देखील अनिल देशमुख आपल्याला बदल्यांच्या याद्या द्यायचे, असा दावा केला. सोशल मिडियावरील या आरोपांच्या चौकशीची मागणी केल्यानंतर आता भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावरही हल्ला चढवला आहे.
भातखळकर यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत संजय राऊत यांना काही प्रश्न विचारले आहेत. भातखळकर म्हणाले, माऊथ डायरिया झाल्यासारखे जगभरातील घडामोडींवर भाष्य करणारे विश्व प्रवक्ते संजय राऊत यांची आज प्रवीण राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा अटक केल्यानंतर नेमकी प्रतिक्रिया काय आहे?
माझा संजय राऊत यांना आग्रह आहे, की प्रवीण राऊत आणि तुमचे संबंध काय आहेत? हे त्यांनी आता जगासमोर सांगाव. नाहीतर शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर वाईन कंपन्यांमध्ये त्यांच्याच मुलींची हिस्सेदारी उघडकीस आली.
तसेच प्रवीण राऊत यांच्याबातीत अन्य काही उघडीकस येण्याधीच माझा संजय राऊतांना सल्ला आहे, की प्रवीण राऊत आणि तुमचे काय संबंध आहेत? हे तुम्ही आपणहून जनतेला सांगाव, असा टोला भातखळकर यांनी संजय राऊत यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.