Chandrakant Patil, Raj Thackeray,  Sarkarnama
मुंबई

चंद्रकांतदादाचे थेट उत्तर मनसेसोबत युती नाही...

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी सुचना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आगामी महापालिका निवडणूकांत भाजपची मनसे सोबत युती होईल, अश्या चर्चा रंगत होत्या. मात्र, याबाबत दोन्हींही पक्षांकडून आता स्पष्ट प्रतिक्रिया आल्या आहेत. मनसेसोबत युतीचा काही प्रस्ताव नाही. भाजपचे मित्र पक्ष आहेत. मात्र, मनसेसोबत कोणतीही युती नाही, अशी माहिती भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. तर, आज (ता.2 फेब्रुवारी) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले आहेत. त्यांच्या या प्रतिक्रियेवर पाटील यांनीही भाजपची युतीबाबतची भूमीका स्पष्ट केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी युतीबरोबरच नितेश राणे प्रकरणी बोलतांना म्हणाले की, राज्य सरकार आणि त्याचे मंत्री सत्येचे दुरूपयोग करत आहेत. या सगळ्याचे बुरखे आहेत ते सगळे बाहेर येणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या मुलांसोबत हे सरकार चुकीचे वागत आहे. आता ते कोर्टात आहेत. त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही. तसेच, अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) असे म्हणालेत की, मी बोलायला लागलो तर, महागात पडेल, आता तेच चित्र दिसून येत आहे. सगळ्यांनी आता अनिल देशमुख यांच्या डोक्यावरचा हात काढला आहे. आता खर लोकांनसमोर येत आहे. जेव्हा पोलिस commissioner अरोप करतात. तेव्हा गृहमंत्र्याची वेगळीच चौकशी सुरू आहे. तसेच, अनिल परबांचा रिसोर्टही तोडण्यात येत आहे, अश्या शब्दात त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, भाजप आणि मनसे युतीसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रे येथील एमआयजी क्रिकेट क्लब येथे आज मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आगामी राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी स्वबळावरच तयार रहण्याच्या सुचना दिल्या आहेत.

बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले होते की, युतीकडे लक्ष न देता आम्हाला आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश ठाकरेंनी दिले आहेत. भाजप मनसे युती बाबत पूर्णविराम नाही. कोणी हात पुढे केला तर, तेव्हा चर्चा होईल. कोणी चर्चा करायला येत असेल तर चर्चेचे दरवाजे खुले ठेवावे लागतात. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची टीम प्रत्येक महापालिका क्षेत्रात जाणार आणि तेथील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील. परंतु निवडणूक होणार की नाही हा प्रश्न आहे. ज्यावेळी निवडणुकींचे चित्र स्पष्ट होईल तेव्हा मनसेचा जाहिरनामा पुढे येईल, असे त्यांनी सांगितले होते. यावर आता पाटलांनी युतीबाबत भाजपची भूमीका जाहीर करत युतीचा मनसेकडून कुठलाही प्रस्तान नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे भाजप आणि मनसे युतीची शक्यता कमी झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT