Mumbai News, 23 Mar : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पक्षात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांची निवड करण्यात आली आहे. तर राजपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भाकरी फिरवल्याचं दिसत आहे. आज मुंबईत पार पडलेल्या मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, आज झालेल्या बैठकीत मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. तर कुलाबा ते माहीम आणि कुलाबा ते शीव या भागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे.
तसंच गोरेगावकडील भागाची जबाबदारी कुणाल माईणकर आणि पूर्वेकडच्या भागाची योगेश सावंतांकडे देण्यात आली आहे. निवड झालेल्या नेत्यांनी नेमकं काय काय करायचं याबाबतची माहिती 2 तारखेला सांगणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
तर संदीप देशपांडेंच्या (Sandeep Deshpande) अध्यक्षतेखाली ३ उपाध्यक्ष असणार आहेत. मुंबई विभाग अध्यक्षांवर नितीन सरदेसाई यांचं नियंत्रण असेल तसंच ठाण्यात देखील केंद्रीय समिती नेमण्यात आली असून यामध्ये अविनाश जाधव यांचा समावेश आहे.
राजू पाटील हे देखील काही जबाबदारी सांभाळतील असं राज यांनी सांगितलं. तर सध्या मुंबई आणि ठाण्यासाठी लागू केलेली पक्ष रचना एप्रिल मे या महिन्यात संपूर्ण राज्यभरात राबवली जाणार असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.