RSS Sarkarnama
मुंबई

RSS News : लोकसभेला फटका, आता महायुतीच्या मदतीसाठी 'RSS' धावली, मुंबईतील 36 जागांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय

Mahayuti Mumbai Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी 'आरएसएस' चांगलीच कामाला लागली आहे. त्यातच संघानं विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला काही सूचना करतानाच मुंबईतील 36 मतदारसंघासाठी मोठी रणनीती आखली आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : लोकसभेला अतिआत्मविश्वासात गेलेल्या भाजपसह महायुतीला महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत चांगलाच फटका बसला होता. या निवडणुकीत भाजपनं आपली मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच 'साईडलाईन' केल्याची जोरदार चर्चा होती. आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं सावध भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू असतानाच आता निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) 'एन्ट्री' झाली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांसाठी'आरएसएस'चांगलीच कामाला लागली आहे.त्यातच संघानं विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला काही सूचना करतानाच मुंबईतील 36 मतदारसंघासाठी मोठी रणनीती आखली आहे. यापूर्वी संघानं भाजपला निवडणुकीत नवे चेहरे उतरावा असा आग्रह आग्रह धरला होता. त्याचवेळी आता संघदेखील निवडणुकीसाठी दक्ष झाल्याचं दिसून आलं होतं.

मुंबईतील 36 मतदारसंघासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघानं 72 समन्वयकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक मतदारसंघात दोन समन्वयक युतीच्या उमेदवारांसाठी काम करणार आहे. याचा मोठा फायदा महायुतीला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मुंबईतील 36 मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असली तरी मनसे,बंडखोरांमुळे काँटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन मोठे पक्ष फुटल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली आहे. मुंबईतील बहुतांश मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकासाआघाडी विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात 420 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

महाविकास आघाडीने मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 22, काँग्रेस 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 2 तसेच एका जागेवर समाजवादी पार्टीचा उमेदवार रिंगणात आहे. तर महायुतीतील भाजप 18, एकनाथ शिंदे शिवसेना 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने 2 जागांवर उमेदवार दिले आहेत.

तसेच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील 36 पैकी 25 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यामुळे मराठी मतदारांच्या मतांची विभागण्याचा धोका आहे. मनसेच्या उमेदवारांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीसमोर तगडं आव्हान उभं राहिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT