Harshvardhan Patil News : विधानसभा निवडणुकीत इंदापूरच्या जागेवरून वाद होण्याची चिन्ह आहेत. विद्यमान आमदार असलेल्या पक्षाला ती जागा देण्याची चर्चा आहेत. त्यामुळे भाजपचे नेते, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांना येथे तिकीट मिळण्याची शक्यता कमीच असल्याच्या चर्चा आहेत.
त्यामुळे पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांचा असतानाच हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जात 'तुतारी' हाती घेतील या चर्चांना जोर आला आहे. शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा लढणार, अशी चर्चा होत असताना खुद्द हर्षवर्धन पाटील यांनीच यावर स्पष्टीकरण दिले आहे.
'तुतारी' चिन्हावर लढण्याविषयी तसेच शरद पवार गटात प्रवेश करण्याविषयी हर्षवर्धन पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, 'मी कोणाच्याही संपर्कात नाही. माझ्याशी देखील कोणी संपर्क केला नाही.' हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचेच खुद्द पाटील यांनीच स्पष्ट केले आहे.
ज्याचा विद्यमान आमदार असेल त्याला ती जागा सूटणार, असा चर्चा आहेत. आम्ही, आमचे कार्यकर्ते हे लोकसभा निवडणुकीत चांगले आणि विधानसभेत वाईट असे होते आहे. हे फक्त एकदा नाही मागील सहा निवडणुकांमध्ये झाले आहे, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी अप्रत्यक्ष अजित पवारांना टार्गेट केले आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी एक महिना पुढे जाण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच एका कार्यक्रमात बोलताना तुम्हाला स्पष्ट आम्हाला बोलता येत नाही. तुमच्या मनात जे आहे ते तुम्ही उघड बोलत आहात मला बोलता येत नाही. त्यावेळी खाली बसलेल्या नागरिकांमधून 'विकास आघाडी' म्हणून जोरदार घोषणा दिल्या.
त्याला हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना स्मितहास्य करत प्रतिसाद दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपचे तिकीट मिळाले नाही तर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी हर्षवर्धन पाटील यांनी केल्याची बोलले जात आहे.
प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटते आपल्या नेत्याला तिकीट मिळावे. हर्षवर्धन भाऊंच्या कार्यकर्त्यांना वाटते त्यांना तिकीट मिळावे त्यात काही चुकीचे नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटते मला तिकीट मिळावे त्यातही काही चुकीचे नाही. हर्षवर्धन पाटलांना तिकीट मिळाले तर मी त्यांचे जोरात काम करेल, असे आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.