Ravindra Dhangekar sarkarnama
पुणे

कसब्यात भाजपमध्ये कमालीची गोंधळाची स्थिती, धंगेकरांचा विजय अधिक सोपा: मोहन जोशी

कसबा विधानसभा मतदारसंघातील आपल्या पक्षातर्फे कोणाला उमेदवारी द्यावी, याविषयी भाजपमध्ये कमालीची गोंधळाची स्थिती अनुभवायला मिळाली. शेवटी उशिराने त्या पक्षाने गेल्यावेळी पराभूत झालेल्या उमेदवारालाच पुन्हा उमेदवारी दिली.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : ‘‘कसबा विधानसभा मतदारसंघातील आपल्या पक्षातर्फे कोणाला उमेदवारी द्यावी, याविषयी भाजपमध्ये कमालीची गोंधळाची स्थिती अनुभवायला मिळाली. शेवटी उशिराने त्या पक्षाने गेल्यावेळी पराभूत झालेल्या उमेदवारालाच पुन्हा उमेदवारी दिली.

त्यामुळे भाजपमध्ये कसब्यात सध्या जी संभ्रमावस्था निर्माण झाली, ती काँग्रेसच्या पथ्यावरच पडली असून, काँग्रेसचा विजय अधिक सोपा झाला आहे,’’ असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी केले.

जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले की, कसबा हा आमचा बालेकिल्ला आहे, अशा फुशारकीने वागून भाजपने येथील मूलभूत समस्यांकडे दुर्लक्षच केले. रवींद्र धंगेकर यांना येथून आमदारकीची संधी मिळाल्यानंतर या मतदारसंघात कसे काम होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे मतदारांचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

दरम्यान, सोमवारी (ता. ११) सकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा मतदारसंघातील विविध भागांतून पदयात्रा काढली. याही पदयात्रेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पक्ष आणि अन्य मित्र पक्षांचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT