PM Narendra Modi 1 Sarkarnama
पुणे

PM Narendra Modi : राष्ट्रपती नाराज; आता मोदींच्या वेळी, तरी काळजी घ्या!

Pune Police letter to PMC as PM Narendra Modi is coming to Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असून पुणे प्रशासन अलर्ट झालं आहे. पुणे पोलिसांनी PMCला रस्त्यासंदर्भात दिलेलं पत्र व्हायरल झालं आहे.

Sudesh Mitkar

Pune News : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणे शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. महापालिकेकडून खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

तरी देखील शहरातील बहुतांश रस्त्यांवर ती मोठ्या प्रमाणात खड्डे पाहायला मिळत आहेत. आता या खड्ड्यांबाबत राष्ट्रपती कार्यालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे दौऱ्यावर होत्या, या दौऱ्यादरम्यान शहरातील खड्ड्यांबाबत त्यांच्या कार्यालयाने नाराजी व्यक्त केली असल्याचं पुणे (Pune) पोलिसांनी सांगितलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होत्या. महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान त्यांनी पुण्यात देखील काही कार्यक्रमांना भेटी दिल्या. तर 3 सप्टेंबरला त्यानी ‘सिम्बायोसिस इंटरनॅशनल’च्या 21व्या दीक्षांत समारंभाला संबोधित केलं होत.

या दौऱ्या दरम्यान राष्ट्रपती पुण्यात आल्या होत्या त्यावेळेस त्यांना पुण्यातील खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागल्या असल्याचं समोर आला आहे. ज्या रस्त्याने त्या जाणार होत्या, त्या मार्गावर बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याचं सांगत राष्ट्रपती कार्यालयाने याबाबत नाराजी कळवली होती.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते पुणे मुक्कामी देखील असणार आहेत. ते एसपी कॉलेज येथील कार्यक्रमासह विकसित भारतच्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावणार आहेत. त्यामुळे पुणे शहरातील बहुतांश रस्त्यावरून त्यांचा प्रवास होणार आहे. याच दृष्टिकोनातून आता पुणे पोलिसांनी महापालिकेला पत्र पाठवत सदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची विनंती केली आहे.

या पत्रामध्ये पंतप्रधान महोदय, भारत सरकार यांचा दिनांक 27/09/2024 पुणे दौरा असल्याने व्हीव्हीआयपी यांचे जाणे येणेचे मार्गावर तसेच मेट्रोचे काम चालू असलेल्या ठिकाणी रोडची डागडुजी करुन, रोडवरील अडथळे काढून, खड्डे बुजवून, रस्ता सुस्थितीत करुन ठेवावा, अशी विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT