पुणे : मुस्लीम धर्मियांनी उत्तर देणे बंद केल्याने आता पुढील काळात आरक्षणाच्या मुद्यांवरून दंगली घडविण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल असा आरोप भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला. सत्ताधाऱ्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही, घटनेने दिलेले आरक्षण कोणीही काढून घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असा सल्लाही त्यांनी भटक्या विमुक्तांच्या अधिवेशनात दिला.
भटक्या विमुक्त जमाती संघटनांच्या सातव्या पंचवार्षिक अधिवेशनाच्या व्यासपीठावरून डॉ. आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका केली. देशातील सद्यस्थितीची माहिती देत आंबडेकर यांनी सरकारचा समाजात अस्थिरता निर्माण करून आणिबाणी निर्माण करून निवडणुका लांबविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि आरएसएसचे कार्यकर्ते आरक्षण रद्द करण्याची मागणी करीत आहे. पुढील काळात आरक्षण विरोधी आणि आरक्षणाच्या समर्थकांमध्ये दंगल घडविल्या जातील. मुस्लीम समाज त्यांना उत्तर देत नाही, त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्यावरच दंगल घडविण्यात येतील. मुस्लीम समाजाप्रमाणेच आरक्षणाचे समर्थन करणाऱ्यांनी त्यांना उत्तर देणे टाळले पाहीजे. वातावरण तापविण्याचा त्यांचा हेतू साध्य होता कामा नये''
नागपुर येथे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या( आरएसएस ) मुख्यालयात उपस्थित राहिलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. "ज्या कॉंग्रेस पक्षाने मुखर्जी यांना राष्ट्रपती केले त्या पक्षाशी देखील ते इमानदार राहू शकले नाही. देशाचे संरक्षण लष्कर करू शकत नसेल तर आरएसएस करेल असे विधान करणाऱ्यांना त्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते. लष्कराच्या तिन्ही दलांचे ते प्रमुख होते. त्यांनी जबाबदारीने त्यांना ठणकावून सांगितले पाहीजे होते.'' असे त्यांनी नमूद केले.
* नक्षलवादाविषयीच्या आरोपांबाबत 13 जुनला पत्रकार परीषदेत उत्तर देणार
* अपेक्षाभंग झाल्यानेच सर्व सामान्य माणसानेत हातात सत्ता घेतली पाहीजे
* लोकाभिमुख नाही तर देशांत पक्षाभिमुख लोकशाही
* सत्ताधाऱ्यांच्या पारदर्शी कारभाराच्या दाव्यातील फोलपणा पंधरा दिवसांत उघड करणार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.