Pune Assembly Election 2024  
पुणे

Pune Assembly Election 2024 : प्रचाराच्या धामधुमीत आमदार रवींद्र धंगेकर यांनी घडवले माणुसकीचे दर्शन

गरीब असाह्य रुग्णाला तातडीने पुरवले ऑक्सिजनचे मशीन

सरकारनामा ब्यूरो

पुणे : निवडणुकीच्या रणधुमाळीत सगळेच उमेदवार अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याची शेवटच्या प्रचार दिनी धावपळ करत असताना आमदार रवींद्र धंगेकर यांनी मात्र आज या प्रचारातून वेळ काढत निलायम टॉकीज जवळील गरिबांच्या वस्तीत राहणाऱ्या एका असाह्य रुग्णाला त्याच्या घरी जाऊन ऑक्सिजनचे मशीन पुरवले आणि माणुसकीचे एक आगळेच दर्शन घडवले. त्याची सध्या चांगली चर्चा रंगली आहे.

निलयम टॉकीज जवळील एका वसाहतीमध्ये एका गरीब रुग्णाला त्याचे ऑक्सिजन पुरवठा करणारे मशीन बिघडल्याने त्याच्या श्वसनाला त्रास होत होता. पण गरिबीमुळे त्याला नवीन मशीन तातडीने घेता येत नव्हते. ही माहिती समजताच आमदार रवींद्र धंगेकर स्वतः ऑक्सिजनचे नवीन मशीन घेऊन त्याच्या घरी पोहोचले आणि त्याला ही मदत दिली. अचानक न मागता मिळालेल्या या मदतीमुळे या रुग्णाच्या डोळ्यात अश्रूतरळले. तेथील अन्य रहिवाशांनीही या प्रकारामुळे धंगेकर यांना भरभरून धन्यवाद दिले. ऐन निवडणूकिच्या धानधुमीत एखाद्या सामान्य नागरिकांसाठी इतकी तत्परतेने मदत देणारा उमेदवार क्वचितच पाहायला मिळतो अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राजेंद्र नगर व दांडेकर पूल परिसरात धंगेकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतल्या. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीस सरकारच्या गैरकारभारावर चौफेर तोफ डागली. या सरकारच्या गैरप्रकाराच्या विरोधात आणि सामान्य माणसांची जी गळचेपी होते आहे, त्याच्या विरोधात आमदार रवींद्र धंगेकर एखाद्या लढवय्याप्रमाणे लढले.

पुण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी तळमळीने आवाज उठवला. सरकारच्या विरोधात ते उभे ठाकले. या लढ्यात आम्हीही त्यांना सक्रिय साथ दिली. पुण्यात मादक द्रव्य तस्करीची मोठी साखळी, धंगेकर यांच्यामुळेच उघडकीला आली, त्यामुळे येथील नागरिकांनी आपली जबाबदारी समजून धंगेकर यांना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवले पाहिजे असे आवाहन सुषमा अंधारे यांनी यावेळी केले. यावेळी आमदार धंगेकर यांच्या पत्नी सौ धंगेकर सौ मारटकर, अनिल यनपुरे,चंदन साळुंखे, अनिल धिमधीमे, उमेश गालींदे, संदीप गायकवाड, आदी उपस्थित होते.

दरम्यान काल धंगेकर यांनी संपूर्ण कसबा मतदार संघात जीप यात्रा काढून हा मतदारसंघ ढवळून काढला कसबा गणपती पासून निघालेल्या या जीप यात्रेत असंख्य दुचाकीस्वार कार्यकर्ते सहभागी झाले होते. नाना पेठ, लोहिया नगर, सोन्या मारुती चौक, पंच हौद मिशन, राष्ट्र भूषण चौक, टिळक रोड, नवी पेठ, सेनादत्त पेठ, दत्तवाडी, पासोड्या विठोबा, पवळे चौक आदी भागातून ही जीप यात्रा काढण्यात आली. जागोजागी या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यात रवींद्र माळवदकर अण्णा थोरात, वीरेंद्र किराड, शिवराज भोकरे, अक्षय माने, सौरभ अमराळे, विशाल धनवडे, गणेश नलावडे, आदी सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT