Sarkarnama Banner (39).jpg
Sarkarnama Banner (39).jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

उपमुख्यमंत्री पदाबाबत सुखबीर सिंह बादल यांची महत्वाची घोषणा...

सरकारनामा ब्युरो

जालंधर (पंजाब) : पंजाबमध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यांची तयारी आतापासून सुरू झाली आहे. शिरोमणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी आज उपमुख्यमंत्री पदाबाबत महत्वाची घोषणा केली आहे. 

२०२२ मध्ये जर अकाली दलाचे सरकार आले तर दलित व्यक्ती ही उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होईल. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात सुखबीर सिंह बादल बोलत होते. 

सुखबीर सिंह बादल म्हणाले की २०२२च्या विधानसभा निवडणुकीत अकाली दलाचे सरकार आले तर दोआबा परिसरात डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भव्य विद्यापीठ पंजाबमध्ये उभारण्यात येईल. विधानसभा निवडणूक ही काही पक्षांशी युती करून लढविली जाणार आहे. याबाबत काही राजकीय पक्षाबाबत युती करण्यासाठी सध्या चर्चा सुरु आहे. काही दिवसात हे याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

सुखबीर बादल यांच्या या व्यक्तव्यानंतर पंजाबच्या राजकारणात चर्चेला सुरवात झाली आहे.  पंजाबमध्ये ३२ टक्के मतदान हे दलित समाजातील आहे. देशात सर्वात जास्त दलित मतदान हे पंजाबमध्ये आहे. येथे दलित समाज एका विशिष्ट पक्षासोबत नाही, शिरोमणि अकाली दल आणि काँग्रेस यांच्यात दलित मतांची विभागणी होत असते. मध्यतरी बहुजन समाज पार्टीने (बीएसी) दलित समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. २०१७ च्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये प्रवेश केल्याने काही दलित मते आम आदमीच्या पारड्यात पडली होती. 

पंजाबमध्ये सर्वच पक्ष दलित वोट बॅकला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत असतात, अशातच सुखबीर बादल यांनी निवडणुकीच्या एक वर्षांआधी आज उपमुख्यमंत्री दलित परिवारातील व्यक्ती विराजमान होईल, अशी घोषणा करून मास्टर स्ट्रोक लगावला आहे. परंतु अन्य पक्षांनी दलितांना आपल्याकडे खेचण्यासाठी अजून पत्ते उघडलेले नाही, त्यामुळे आता अन्य पक्ष दलितांना आपल्याकडे खेचण्यासाठी काय करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT