two bjp workers their psos held for faking militant attack in Jammu and Kashmir  .jpg
two bjp workers their psos held for faking militant attack in Jammu and Kashmir .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

धक्कादायक : भाजपच्या नेत्यांनीच केला दहशतवादी हल्ल्याचा बनाव...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आपल्याला पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात मिळावी या हेतूने कुपवारा येथे दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव करणाऱ्या भाजपच्या (Bjp)दोन पदाधिकाऱ्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (two bjp workers their psos held for faking militant attack in Jammu and Kashmir)  

इश्फाक अहमद मीर असे अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकाचे नाव आहे. तो कुपवारा येथील भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख आहे. पक्षाचे जिल्हा प्रवक्ते बशरत अहमद आणि आपल्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांने दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केला. या घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत भाजपचे कुपवारा जिल्हाध्यक्ष मोहम्मद शाफी मीर यांना पदावरुन हटवण्यात आल्याचे सांगितले आहे. 

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'या प्रकरणाची संपूर्ण माहिती आम्हाला एक दोन दिवसांमध्ये मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इश्फाकवर १६ जुलैला हल्ला झाल्याचे सांगण्यात आले होते. गुलगाम गावामध्ये मदत साहित वाटत असताना हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यामध्ये माझ्या हाताला गोळी लागल्याने मी जखमी झाल्याचेही इश्फाकने सांगितले होते. मात्र, त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि हा दहशतवादी हल्ला नसल्याचे समोर आले. 

दहशतवाद्यांशी लढताना इश्फाकच्या सुरक्षा रक्षकाकडे असलेल्या बंदुकीमधून चूकून सुटलेल्या गोळीमुळे तो जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर इश्फाक, बशरत आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी बनाव करत ही घटना घडल्याची खोटी कहाणी रचल्याचे समोर आले.

पोलिसांकडून सुरक्षा मिळावी या हेतूने आपल्यावर हल्ला झाल्याचा बनाव या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच पक्षाच्या नेत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी त्यांनी खोटी माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. इश्फाकला झालेली जखम ही गोळीने झाल्याचे दाखवण्यासाठी विशेष प्रयत्न या दोघांनी केल्याचे सुत्रांनी सांगितले. सोमवारी या प्रकरणामध्ये आरोपी असणाऱ्या दोन सुरक्षा रक्षांसहीत दोन्ही भाजप पदाधिकाऱ्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

भाजपने इश्फाकच्या वडिलांना पदावरुन हटवले आहे. भाजपचे प्रसारमाध्यम प्रमुख मनझूर अहमद भट यांनी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना सांगितले की 'तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांना निलंबीत केले आहे. या प्रकणाचा तपास २५ जुलैपर्यंत पूर्ण होईल. त्यांच्या मुलाने हल्ला झाल्याचा बनाव केल्याच्या शक्यतेवरुन पक्षाने ही कारवाई केली आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत, असे भट यांनी सांगितले.  इश्फाक आणि बशरतने सुरक्षेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याचे ही त्यांनी म्हटेल आहे. सुरक्षेसंदर्भातीलन नियमांनुसार आमच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पाच वाजल्यानंतर बाहेर न पडण्याच्या सूचना करण्यात आल्यात. ते लोक मदतकार्यातील सामान वाटप करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. मात्र एवढ्या संध्याकाळी जाण्याची गरज नव्हती, असेही भट म्हणाले.

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT