Amit Ujagare
मध्य-पूर्व आशियात सध्या युद्धाचं सावट आहे. अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराणवर असं हे युद्ध सुरु असून दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर क्षेपणास्रांचा मारा केला जात आहे.
आता हे युद्धाचे ढग अधिकच गडद होऊ लागले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून इराणनं आपला होर्मुझच्या खाडीतला तेल वाहतुकीचा मार्ग बंद केला आहे.
जगभरामध्ये समुद्रमार्गेच खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांची वाहतूक होते. यातील एखादा मार्ग बंद पडला तरी जगाचे अर्थकारण डळमळू शकते.
आता होर्मुझची सामुद्रधुनी इराणकडून बंद झाल्याने भारतासह आशियायी देशांच्या अर्थकारणाला जबर फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मलाक्काची सामुद्रधुनी : २३.७ (दशलक्ष बॅरल, प्रतिदिन), होर्मुझची सामुद्रधुनी : २०-२१ (दशलक्ष बॅरल, प्रतिदिन).
सुएझ कालवा : ४.९ (दशलक्ष बॅरल, प्रतिदिन), बाब-एल- मानदेब : ६.२ (दशलक्ष बॅरल, प्रतिदिन)
केप ऑफ गुड होप : ९.२ (दशलक्ष बॅरल, प्रतिदिन), डॅनिश सामुद्रधुनी : ४.९ (दशलक्ष बॅरल, प्रतिदिन)
तुर्कीएची सामुद्रधुनी : ३.२ ते.३.७ (दशलक्ष बॅरल, प्रतिदिन), पनामा कालवा : २.३ (दशलक्ष बॅरल, प्रतिदिन)