Pakistani Spies in India : फक्त ज्योती मल्होत्राच नाही तर 10 जणांवर आहे देशद्रोहाचा आरोप? जाणून घ्या कोण आहेत हे सर्व?

Aslam Shanedivan

ऑपरेशन सिंदूर

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानला चोख उत्तर देण्यात आले आहे.

Pakistani Spies in India | Sarkarnama

गुप्तचर यंत्रणा

तर या हल्लानंतर आता देशातील गुप्तचर यंत्रणा आता पूर्णपणे सतर्क झाल्या असून विविध ऑपरेशन राबवली जातायत.

Pakistani Spies in India | Sarkarnama

10 जणांना अटक

ऑपरेशन सिंदूरनंतर आतापर्यंत 10 जणांना गुप्तचर यंत्रणांनी अटक केली असून आणखी अनेक लोकांचा शोध सुरक्षा एजन्सी घेत आहेत.

Pakistani Spies in India | Sarkarnama

युट्यूबर ज्योती

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणाच्या हिसार पोलिसांनी युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केली आहे. पण तिच्याआधी पंजाबमधून गजाला आणि यामीन मोहम्मद या दोन हेरांना पकडण्यात आले होते.

Pakistani Spies in India | Sarkarnama

नोमान इलाही आणि गुप्तहेर धिल्लॉन

दरम्यान पंजाब आणि हरियाणा पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नोमान इलाहीला आणि गुप्तहेर देविंदरसिंग धिल्लॉनला कैथलमध्ये बेड्या ठोकल्या

Pakistani Spies in India | Sarkarnama

अरमानला नूह, यूट्यूबर प्रियांका सेनापती

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अरमानला नागेना पोलिसांनी अटक केली असून पुरीची युट्यूबर प्रियंका सेनापती हिची सध्या चौकशी केली जातेय. प्रियंका सेनापती युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या संपर्कात होती.

Pakistani Spies in India | Sarkarnama

नवांकुर चौधरी व्यापारी शहजाद

युट्यूबर ज्योती मल्होत्रा, प्रियंका सेनापतीसह नवांकुर चौधरीचेही या प्रकरणात नाव जोडले गेले आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमधून व्यापारी शहजादलाही आणि जालंदरमधून मोहम्मद मुर्तझा अलीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Pakistani Spies in India | Sarkarnama

Salary of a fighter pilot : फक्त पगार नाही, फाइटर पायलटला मिळतात हे खास फायदे!

आणखी पाहा