Jagdish Patil
विधानसभेच्या तोंडावर महायुतीने राज्यपालनियुक्त आमदारांचा विषय निकाली काढला. या आमदारांचा शपथविधीही आज पार पडला.
यामध्ये भाजपच्या 3 आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 2 आमदारांचा समावेश आहे.
या सर्व सदस्यांमध्ये भाजपने उमेदवारी दिलेले महंत बाबुसिंग महाराज राठोड यांचं नाव सध्या चर्चेत आहे.
10 दिवसांपूर्वी पोहरादेवी इथे बंजारा समाजाच्या 5 मजली नंगारा वस्तूसंग्रहालयाचं अनावरण PM मोदींनी केलं. त्यावेळी त्यांनी महंत बाबुसिंग महाराज राठोड यांची भेट घेतली होती.
महंत बाबुसिंग महाराज राठोड हे बंजारा समाजातील सर्वात मोठे श्रद्धा केंद्र असलेल्या पोहरादेवी शक्तीपीठाचे प्रमुख धर्मगुरू आहेत.
वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी बंजारा समाजासाठी काशी म्हणून ओळखले जाते.
संत रामराव महाराजानंतर या शक्तीपीठाचे उत्तराधिकारी म्हणून महंत धर्मगुरू बाबुसिंग महाराज यांची निवड करण्यात आली.
बाबुसिंग महाराज हे संत रामराव महाराजांचे पुतणे असून त्यांच्या इच्छेनुसार बाबुसिंग महाराजांना वारसदार ठरविण्यात आलं आहे.
तर बंजारा समाजाची मते मतपेढी आकर्षित करण्यासाठी भाजपने महंत बाबुसिंग महाराजांना विधान परिषदेवर संधी दिल्याचं बोललं जात आहे.