Statue Of Oneness : 108 फूट उंच, 100 टन वजन... आद्य शंकराचार्यांच्या पुतळ्याचे मध्य प्रदेशात अनावरण

Rashmi Mane

मूर्तीचे अनावरण

मध्य प्रदेशातील खंडवा येथील ओंकारेश्वर येथे जगद्गुरू शंकराचार्यांच्या १०८ फूट उंचीच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.

Statue Of Oneness | Sarkarnama

एकात्मता की मूर्ती

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विश्वाला शांती आणि एकतेचा संदेश देणाऱ्या आदिगुरू शंकराचार्य यांच्या एकात्म धाम येथील 108 फूट उंच ‘एकात्मता की मूर्ती’चे अनावरण केले.

Statue Of Oneness | Sarkarnama

वैदिक धर्माची ध्वजा

अखिल भारताच्या एकात्मतेची मूर्ती घडविणाऱ्या अद्वैतवादी वैदिक तत्त्वज्ञानी शंकराचार्यांनी भारतखंडाच्या चारही कोपऱ्यांत वैदिक धर्माची ध्वजा रोवली.

Statue Of Oneness | Sarkarnama

वैदिक धर्माचा प्रचार

वैदिक धर्माच्या विचारांना जगभरात पोहोचविण्याचा प्रयत्न मध्य प्रदेश सरकारने केला आहे.

Statue Of Oneness | Sarkarnama

अनावरण करण्यात आले...

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील नर्मदा नदीकाठावरील ओंकारेश्वर येथील मांधाता पर्वतावर संत समाजातील गुरू आदि शंकराचार्यांच्या 108 फूट उंचीच्या अष्टधातू प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.

Statue Of Oneness | Sarkarnama

'स्टॅच्यू ऑफ वननेस'

आचार्य शंकराचार्यांच्या पुतळ्याचे नाव 'स्टॅच्यू ऑफ वननेस' ठेवण्यात आले आहे.

Statue Of Oneness | Sarkarnama

बाल स्वरूप मूर्ती

108 फूट उंच अष्टधातू मूर्ती आचार्य शंकराचार्यांच्या बाल स्वरूपाची (वय 12 वर्षे) आहे. पुतळ्याच्या पायथ्याशी 75 फुटांचा पायथा आहे.

Statue Of Oneness | Sarkarnama

मूर्तीचे वजन

या मूर्तीचे वजन 100 टन एवढे आहे. यामध्ये 88 टक्के तांबे, 4 टक्के जस्त आणि 8 टक्के टिनचा वापर करण्यात आला आहे.

Statue Of Oneness | Sarkarnama

Next : कधी मेकॅनिक, तर कधी कुक, अन् आता कुलीच्या वेशात... पाहा राहुल गांधींचे खास लूक

Rahul Gandhi | Sarkarnama
येथे क्लिक करा