सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वसामान्यांचे जीवन सुखी करणाऱ्या अनेक योजना सुरू केल्या. त्याचबरोबर महत्त्वाचे निर्णयही त्यांनी घेतले आहेत.
पृथ्वीराज चव्हाण हे पहिल्यांदा 1991 मध्ये काँग्रेसमधून कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.
1996 आणि 1998 च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. 2002 ते 2008 मध्ये संसदेत त्यांनी कराड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
संसदेत सार्वजनिक उपक्रम, विज्ञान व तंत्रज्ञान, वित्त व नियोजन यांसारखी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत.
विश्व संसदीय संघटनेच्या लंडन, पॅरिस, जिनेव्हा आणि टोकियो येथील अधिवेशनामध्ये त्यांनी भारतीय संसदेचे प्रतिनिधित्व केले आहे.
1995 च्या इंग्लंडच्या सत्ताधारी हुजूर पक्षाच्या वार्षिक अधिवेशनात काँग्रेसचे ते प्रतिनिधी होते.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले. विविध राज्यांचे प्रभारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली.
R