24 October 2024 Dinvishesh : राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा जन्म : वाचा इतिहासात काय घडलं होतं या दिवशी

Rashmi Mane

1914 : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंद सेनेचे कप्तानपद भूषवलेल्या आणिराणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या प्रमुखपद सांभाळलेल्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा जन्म. स्त्री-पुरुष समानता, मानवी हक्क आणि जातीयवादाविरुद्धच्या लढ्यात त्या सतत अग्रभागी राहिल्या आहेत.

Sarkarnama

1975 - देशातील वेठबिगार पद्धत नष्ट करण्याचा वटहुकूम राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्याकडून जारी

Sarkarnama

1977 - पुण्याजवळ दिवे घाटात बारामती-पुणे एसटी कोसळून २६ जणांचा मृत्यू

Sarkarnama

1989 : जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांचे निधन. लष्कराचे सरसेनापती होणारे ते पहिले महाराष्ट्रीय अधिकारी होते.

Sarkarnama

1994 - कोलंबोजवळ अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारसभेत झालेल्या बाँबस्फोटात युनायटेड नॅशनल पार्टीचे उमेदवार गामिनी दिस्सानायके यांच्यासह ५७ जणांचा मृत्यू

Sarkarnama

1995 : आशिया खंडातील काही भागांत व भारतातील "नीम का थाना' व "डायमंड हर्बर' येथे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणाऱ्या "डायमंड रिंग' च्या दर्शनाचा लाखोंना अपूर्व अनुभव.

Sarkarnama

1997 : विख्यात सतारवादक पंडित रवी शंकर यांनी संगीतक्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना जपानचा "प्रीमियम इंपीरियल' आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

Sarkarnama

2000 : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना केंद्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

Sarkarnama

2000 : तत्कालीन ब्रह्मदेशाचा राजा थिबा याची रत्नागिरीत वास्तव्यास असलेली नात टुटू हिचे निधन. थिबा राजाची ती अखेरची वंशज होती.

Sarkarnama

Next : राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या चर्चा, कोण आहेत सना मलिक?

येथे क्लिक करा