Rashmi Mane
1978- केरळमध्ये राजकीय पेच, काँग्रेस अडचणीत
1979 - जनता पक्षातील फुटीनंतर विसर्जित झालेल्या लोकसभेसाठी निवडणूक जाहीर.
1980 - पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रेल्वे खात्याच्या कामगिरीवर टीका केल्याने नाराज रेल्वेमंत्री कमलापती त्रिपाठी यांचा पदाचा राजीनामा
1987 - भारताचे श्रीलंकेतील सहाय्यक उच्चायुक्तांच्या कँडी येथील कचेरीत बाँबस्फोट
1994- ए. एम. अहमदी यांची भारताचे 26 वे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक.
2003 : स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून माणसातील भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम घडवणारे आणि जगभर कोट्यवधी शिष्य लाभलेले पांडुरंगशास्त्री आठवले यांचे निधन. भगवद्गीतेतील विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचविणारा ज्ञानयोगी, सामूहिक शेती, स्वयंविकास अशा योजनांतून गावांचा विकास साधणारा कर्मयोगी आणि मागासलेल्या जातींमधील लोकांना व्यसनापासून दूर करणारे स्वाध्याय परिवाराचे प्रमुख, अशी पांडुरंगशास्त्रींची ओळख आहे. त्यांना पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय सन्मान पुरस्कार इ. मानसन्मान मिळाले आहेत.
2009 - इराकमधील बगदादमध्ये आत्मघातकी बाँब हल्ल्यात 155 ठार, 721 जखमी