Jagdish Patil
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना आपल्या अर्जासोबत मालमत्तेबाबतचा तपशील सादर करावा लागतो.
त्यानुसार आदित्य ठाकरेंनी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची वैयक्तिक मालमत्ता दाखवली आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार आदित्य यांच्या मालमत्तेमध्ये मागील 5 वर्षांत जवळपास 6 कोटींची भर पडली आहे.
2019 साली त्यांची एकूण मालमत्ता 17 कोटी 69 लाख रुपये इतकी होती.
तर यंदाच्या विधानसभेसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील त्यांची मालमत्ता 23 कोटी 43 लाख आहे.
यामध्ये 6 कोटी 4 लाखांची स्थावर तर 17 कोटी 39 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
आदित्य ठाकरेंवर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा एक गुन्हा दाखल आहे.
प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार आदित्य यांनी विधि शाखेची पदवी घेतली आहे.